मुंबई: अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हृतिक प्रकरणाची दिशा बदलण्याचा आणि मीडिया ट्रायलचा आधार घेत असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. सोबतच कंगनाने हृतिकला कायदेशीर नोटीस मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. तसं न केल्यास कारवाईचा सामना करण्यास तयार राहा असंही तिनं बजावलं आहे.


 

'जर हृतिकनं ती नोटीस मागे घेतली तर कंगना हे प्रकरण इथंच संपविण्यास तयार आहे.' अशी माहिती कंगनाचे वकील रिजवान सिद्दकी यांनी दिली.

 

आपली प्रतिमा खराब केल्याप्रकरणी हृतिक रोशनने कंगनाला नोटीस बजावली, तर कंगनाने हृतिक रोशनच्या नोटिशीला उत्तरादाखल आणखी एक नोटीस पाठवली होती.

 

वकील रिझवान सद्दिकी यांच्या मार्फत कंगनाने ऋतिक रोशनला 21 पानांची नोटीस पाठवली आहे. ऋतिकने आपल्याला धमकावल्याचा आरोप या नोटिशीमधून कंगनाने केला आहे.

 

काय आहे नेमकं प्रकरण:

 

पत्रकार परिषद घेऊन कंगनाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी हृतिक रोशनने कंगनाला पाठवलेल्या नोटिशीतून केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना- ह्रतिकमध्ये कोल्ड वॉर सुरु आहे.

 

काही दिवसांपूर्वी कंगनाने हृतिकला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला होता की, काहीजण प्रसिद्धीसाठी माझ्या नावाचा वापर करतायेत.

 

कंगनाचं हे वक्तव्य गंभीरपणे घेत हृतिकने तिला नोटीस पाठवलीय. जाहीर पत्रकार परिषदेत माफी मागावी, अशी मागणी हृतिकने केली आहे.

 

डिसेंबर, 2014 मध्ये पहिला गुन्हा

 

– डिसेंबर, 2014 मध्ये सायबर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारील हृतिक ने म्हटलं होतं की, त्याच्या नावाने अज्ञात व्यक्ती फॅनसोबत बोलत आहे.

 

– मात्र त्यावेळी हृतिकने कंगनाचं नाव घेतलं नव्हतं. कारण तिचं नाव घेतलं असतं चौकशीसाठी कंगनालाही बोलावलं असतं.

 

कंगनाची बहिण रंगोलीलाही समन्स

 

– सायबर क्राईम पोलिसांने कंगनाची बहिण रंगोलीलाही समन्सही बजावला आहे.

 

– कंगना आणि कथित बनावट ई-मेलर यांच्यात झालेल्या मेलमधील मजकुराची माहिती रंगोलीला आहे, असं म्हटलं जात आहे.

 

– त्यामुळे रंगोलीलाही सात दिवसांच्या आत जबाब नोंदवण्यास सांगितलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कंगना आणि बनवट मेलर यांनी एकमेकांना हजारो मेल केले आहेत.

 

– मी हा ई-मेल आयडी वापरत नव्हतो, असा दावा हृतिकने केला आहे. तर कंगनाचं म्हणणं आहे की, हृतिकच हा ई-मेल आयडी वापरत होता.

 

– या ई-मेलमध्ये अनेक खासगी व्हिडीओ आणि चॅटचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.

 

बनावट ई-मेल आयडीचा खुलासा कधी झाला?

 

– हृतिकच्या FIR नुसार, हे प्रकरण 24 मे, 2014 रोजी करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत समोर आलं होतं.

 

– क्वीनमधील कंगनाच्या कामाचं कौतुक केल्याबद्दल कंगनाने हृतिकचे आभार मानले होतं.

 

– यावर हृतिक म्हणाला की, मी सिनेमाच पाहिला नाही. शिवाय मी ई-मेलद्वारे कधीही तुझ्याशी (कंगना) बातचीत केली नाही, अंसही हृतिकने कंगनाला सांगितलं होतं.

 

हृतिक कोणत्या ई-मेल आयडीबाबत बोलत आहे?

 

– डिसेंबर 2014 मध्ये हृतिकने सायबर सेलमध्ये एक लेखी तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीनुसार, माझा पर्सनल ई-मेल आयडी hroshan@imac.com आहे, तर कंगना hroshan@email.com या ई-मेल आयडीच्या संपर्कात होती.

 

– तर कंगनाचा दावा आहे की, “या ई-मेल आयडीवरुन हृतिकने माझ्याशी बातचीत केली होती. यानंतर कंगनाने या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी,” अशी मागणी हृतिकने कायदेशीर नोटीस पाठवून केली होती.

 

– त्यानंतर कंगनानेही हृतिक रोशनला नोटीस पाठवली होती.

 

संबंधित बातम्या:

हृतिक-कंगनाच्या भांडणात नवा ट्विस्ट


कंगना, पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी माग: ह्रतिक रोशन


कंगना केस जिंकल्यास हृतिकला 10 वर्षांचा तुरुंगवास?


'मी एकवेळ पोपशी अफेअर करेन..' ट्वीटमुळे हृतिकला नोटीस