मुंबई : माझ्याजवळ असलेल्या पैशांचे मूल्य काळ आणि वेळेनुसार वाढावे, असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी अनेकजण पीपीएफ, एफडी, एसआयपी, शेअर मार्केट असे वेगवेगळे पर्याय शोधतात. या गुंतवणुकीतून अधिक पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. खर्च कमी करून गुंतवणूक वाढवली तरच तुमच्याजवळ असलेल्या पैशांची वाढ होते. तुम्ही बचत आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकता. तुम्ही दीर्घकलीन गुंतवणूक केली तर तुम्हाला कोट्यधीश होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मात्र कोट्यधीश होण्यासाठी तुमच्याकडे गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला असणे गरजेचे आहे.


गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला नसेल तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकत नाही. तुम्ही याआधी अनेकवेळा रूल ऑफ 72 (Rule of 72) हा फॉर्म्युला ऐकलेला असेल. या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुमचे पैसे थेट दुप्पट होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर रुल ऑफ 72 च्या मदतीने पैसे दुप्पट होऊ शकतात. 


Rule of 72 च्या मदतीने पैसे कसे वाढणार?


रुल ऑफ 72 च्या मदतीने तुम्हाला पैसे दुप्पट करायचे असतील अगोदर तुम्ही बचत करायला हवी. त्यानंतर दीर्घकालीन गुंतवणूक चालू ठेवावी. चक्रवाढ व्याजाच्या मदतीने तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे मूल्य वाढत जाईल. दीर्घाकालीन गुंतवणूक केली तरच तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा दिसून येईल. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या मदतीनेच तुम्ही कोट्यवधी बनू शकता. 


चक्रवाढ व्याज कसे काम करते? 


समजा तुम्ही एखद्या ठिकाणी 100 रुपये जमा केले आहेत. तुम्ही जमा केलेल्या या रकमेवर 10 टक्क्यांनी व्याज मिळते.   या व्याजाप्रमाणे तुम्ही जमा केलेल्या 100 रुपयांचे एका वर्षात 110 रुपये होतील. पुढच्या वर्षी तुम्हाला 110 रुपयांवर 10 टक्के व्याज मिळेल. त्यामुले त्याच्या पुढच्या एक वर्षात तुमची जमा असलेली रक्कम 121 रुपये होईल. त्याच्या पुढच्या वर्षाला तुम्हाला 121 रुपयांवर 10 टक्के व्याज मिळेल. 


तुमचे पैसे दुप्पट कधी होणार?  


गुंतवणूक केलेले पैसे दुप्पट कधी होणार, हे जाणून घेण्यासाठी एक फॉर्म्युला सर्रास वापरला जातो. हा रुल ऑफ 72 म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही गुंतवलेले पैसै दुप्पट कधी होणार, हे रुल ऑफ 72 च्या मदतीने जाणून घेता येऊ शकते. समजा तुम्ही 100 रुपयांची गुंतवणूक करत आहात. या गुंतवणुकीवर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांनी व्याज मिळते. तर रुल ऑफ 72 नुसार तुम्हाला 7.2 वर्षे (72/10=7.2) लागतील.  तुम्ही समजा 1 लाख रुपये गुंतवले तर रुल ऑफ 72 नुसार तुमचे पैसे सात वर्षांत दुप्पट होतील.


करोडपती कसे व्हाल? 


निवृत्त झाल्यानंतर तुमच्यावजळ भरपूर पैसे असावेत, असे वाटत असेल तर त्यासाठी आतापासूनच बचत करायला हवी. तुम्ही वयाच्य 25 वर्षांपासून 5 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास आणि तुम्हाला वर्षाला 10 टक्के रिटर्न्स मिळाल असे गृहित धरल्यास तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी कोट्यधीश होऊ शकता. 


हेही वाचा :


MHADA Lottery Mumbai : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी; आजपासून अर्ज नोंदणी सुरू, 13 सप्टेंबरला निकाल


केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होणार, जुलै पासून लागू होण्याची शक्यता


लाडकी बहीण योजनेला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद, महिलांना मिळणार 731 कोटी 85 लाख रुपये, किती महिलांनी केले अर्ज?