Central government employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. जुलै 2024 पासून लाहू होणाऱ्या महागाई भत्त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.  AICPI (ऑल इंडिया कन्झ्यूमर प्राईस इंडिया) चे जून 2024 चे आकडे जारी करण्यात आले आहेत.  या आकडेवारीनंतर आता सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना लाभ होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50 टक्के महागाई भत्ता (Dearness allowance) मिळतो.  AICPI इंडेक्समध्ये 1.5 अंकांची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता महागाई भत्त्यातही वाढ होणार आहे.  


महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता 


जानेवारी ते जून 2024 या कालावधीसाठी AICPI-IW इंडेक्सची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीमुळे जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किती मिळणार हे स्पष्ट झाले आहे. जून AICPI इंडेक्समध्ये 1.5 अंकांनी वाढ झाली आहे. मे महिन्यात AICPI  इंडेक्स 139.9 अंकांवर होता. तो आता वाढून 141.4 वर पोहोचला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात AICPI इंडेक्स 138.9 अंकांवर होता. त्यामुळे महागाई भत्ता वाढून 50.84 टक्क्यांवर पोहोचला होता.


महागाई भत्ता जुलै 2024 पासूनच लागू होणार


केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणार असली तरी त्याला जुलै 2024 पासूनच लागू केले जाईल. जुलै, ऑगस्ट या महिन्यांचा महागाई भत्ता एरियरच्या रुपात दिला जाईल. जून 2024 पर्यंतच्या AICPI च्या आकड्यांनुसारच साताव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किती महागाई भत्ता वाढणार, हे ठरवले जाईल.    


हेही वाचा :


पाच दिवसांत संपूर्ण पगार संपतो? मग 30-30-30-10 फॉर्म्युला वापरा अन् करा भरपूर बचत!


केंद्र सरकार लवकरच एलआयसीमधील हिस्सेदारी कमी करणार? गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची मोठी संधी!


RBI MPC Meeting Today : मोठी बातमी; रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये बदल झाला का? गृहकर्ज, वाहन कर्जाच्या हप्त्यावर काय परिणाम?