परिणामी, ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही पाणी न मिळाल्याने गावातील महिला आज सकाळपासून देवपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आतमध्ये उपोषणाला बसल्या आहे. एकीकडे देशभरात "महिला दिनी" साजरा होतं असताना या महिलांना उपोषण करण्याची वेळ आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.


पुरुष उपसरपंचानं चक्क साडी घालून केलं अभिनव आंदोलन


अशीच काहीशी परिस्थिती भंडाऱ्याच्या परसवाडा गावासह लगतच्या सहा गावांमध्ये बघायला मिळाली असून इथंही मोठं जलसंकट उभे ठाकले आहे. उन्हाळ्याच्या पूर्वीचं पाणी समस्यावर तोडगा काढण्याचं प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आलेत. मात्र, त्यावर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळं परसवाडा गावासह लगतच्या सात गावांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जल संकट उभ ठाकलं आहे. त्यामुळे उद्विग्ध होऊन परसवाडा गावचे उपसरपंच पवन खवास यांनी चक्क साडी घालून डोक्यावर घागर घेतं, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालय गाठतं तिथं घागर फोडली. प्रशासनानं या जलसंकटावर तातडीनं तोडगा न काढल्यास हजारो ग्रामस्थांसह जल आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


मुख्यमंत्र्यांच्या 2 विभागांची एकमेकांवर कुरघोडी


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2 विभागांची एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचा प्रकार  चंद्रपुरात बघायला मिळाला आहे. यात थकीत बिलापोटी महावितरणने पोलिसांची वीज कापली आहे. तर पोलीस विभागाने महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे चालान कापले असल्याचा प्रकर पुढे आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा आणि गृह अशी दोन महत्त्वाची खाती आहेत. त्यात चंद्रपुरात गृह विभाग अर्थात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अंतर्गत महावितरणचे 139 वेगवेगळे कनेक्शन्स आहेत. या वीज कनेक्शन मधून 81 लाखांचे वीज बिल थकीत आहेत. दरम्यान, मार्च अखेर असल्याने हे थकीत बिल भरण्यासाठी महावितरणने रेटा लावला होता. मात्र बिल भरले न गेल्याने अखेर चंद्रपूर शहराच्या गिरनार चौकातील पोलीस वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचे कनेक्शन महावितरणने  कापले आणि यावरूनच दोन विभागातील भांडणाला सुरुवात झालीय. 


अगदी नळावर भांडण व्हावे तसेच पोलिसांनी लगेच सूड उगवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे एक भले मोठे पथक महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केलं आणि बाहेर निघणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गाड्या आणि वाहनांवर चालान ही केलंय. यामुळे भांबावलेल्या व भेदरलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारा बाहेर एकच गर्दी केली. थकीत बिलापोटी पोलीस विभागवार कारवाई केल्यानंतर अशा पद्धतीने गृह अर्थात पोलीस विभाग सूड घेत असेल तर कायदा कुठे आहे? असा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सवाल विचारलाय.  तर दुसरीकडे या सर्व अफवा असून अशा पद्धतीच्या मोहिमा आम्ही अनेक विभागात नेहमी राबवितो असतो, असं पोलीस विभागाने पवित्रा घेतलाय. पोलिसांनी एखाद्या गुंडा सारखी भूमिका घेतल्यानंतर घाबरलेल्या महावितरणने कापलेले एकमेव कनेक्शन पुन्हा जोडून दिले खरं. मात्र यात थकीत बिल भरलेच गेलेले नाही हे विशेष बाब म्हणावी लागेल. 


हे ही वाचा