Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) आपली मूळ त्रिकोण रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. तर, 29 मार्च रोजी शनी (Lord Shani) मीन राशीत संक्रमण करणार आहे. मीन राशीत संक्रमण करताच शनी देव आपली चाल चालणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी देव या राशीच्या तिसऱ्या, सातव्या आणि दहाव्या चरणात संक्रमण करतायत. हा काळ काही राशींच्या लोकांसाठी फार शुभ ठरणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनीची ही चाल लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या सातव्या चरणात संक्रमण करतायत. या राशीच्या लग्न भावात शनी विराजमान आहे. या राशींचं वैवाहिक जीवन फार चांगलं असणार आहे. तसेच, मुलांशी संबंधित तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. कोर्ट कचेरीच्या बाबतीत तुमचा विजय होऊ शकतो.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या कर्म भावात शनी विराजमान आहे. या काळात तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला धनलाभ मिळेल. जर तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फार शुभ ठरणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. कारण या राशीच्या तिसऱ्या चरणात शनी विराजमान आहे. या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्यातील निर्णयक्षमता दिसून येईल. शनी देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. सामाजित प्रतिष्ठेत तुमची वाढ झालेली दिसेल. या काळात तुम्ही एखादं नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: