SeedBall Washim Latest News : गेल्या काही दशकापासून विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाढती जंगलतोड झाली. माणसाने स्वताच्या स्वार्थापोटी वन परिसरात अतिक्रमण केले त्याचा परिणाम पर्यावरणावर झाल्याच चित्र दिसत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे.  याचाच विचार करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी आणि पर्यावरण जोपासण्यासाठी वाशीमचा युवक गेल्या काही वर्षा पासून धडपड करतोय. वाशीममधील मानोरा तालुक्यातील मानोली गावातील दुर्गम भागातील एक युवक गेल्या पाच वर्षांपासून झटतोय. निखील चव्हाण असं या  युवकाच नाव आहे.


माहुली येथील पर्यावरणप्रेमी पक्षीप्रेमी निखील चव्हाण यांनी तब्बल दोन हजार सिड्सबॉल तयार केली आहेत. यासाठी निखीलने तब्बल दहा हजार विविध वृक्षाचे बीज सकंलन केले, असून यामध्ये आंबा, फणस, जांब, जांबुळ, आवळा, कडुनिंब, बेल, आपटा, पळस, बेहडा, चिंच, बहावा बांबुळ, हिवर, सिताफळ, रामफळ, बादाम, कवठ ईत्यादी वृक्षाची बीज सकंलन केली आहेत. निखीलचे दहा हजार सिडबॉल तयार करण्याचं ध्येय आहे  .


सिड्सबॉल हा वृक्ष लागवडीसाठी सर्वात साधा आणी सोपा उपाय आहे. सिड्सबॉल तयार करण्यासाठी काळी माती, शेनखत गौमुत्र,राख जवळपास शंभरग्राम मातीत एक सिड्सबॉल तयार होतो.  पहिल्या वर्षी एक हजार  सिडबॉल तयार करून टप्प्या पार केला. सध्या तो टप्प्या टप्प्या ने एक ते पाच हजारपर्यंत  सिड बॉल निर्मिती करत आहे.  मात्र  पर्यावरण बचावासाठी  निखील मागील पाच वर्षापासून काम करतोय.  वृक्ष लावगड करने, कार्यशाळा घेणे वृक्षाबद्दल जनजागृतीकरणे, नवनवीन वृक्षाची बीज संकलन करून रोप तयार करणे, हे काम निखीलचं नित्याचच झालेय. 


दिवसेंदिवस वाढती वृक्ष तोड ही पशूपक्षासह मनुष्य हाणी  यावर उपाय म्हणून व पर्यावरण संर्धनाला हातभार लावण्यासाठी निखील झटत आहे. निखील लहान मुलाच्या मनात वृक्षप्रेम आवड म्हणून आतापासून त्यांना झाडाविषयी विवीध माहीती अवगत  करुन देत आहे.  काळी माती शेनखत गौमुत्र राखुडी यांच्या मिश्रणामध्ये विविध प्रकारचे बीज टाकुन एक सिड्सबाँल तयार केला जातो. त्यामध्ये शेनखत व गौमुत्र मध्ये पौषक तत्व असल्याने रोप तयार होण्यास मदत होते व वृक्षाची वाढ लवकर होते. पक्ष्यांना उन्हात अन्नसाठी वनवन भटकावे लागते व त्यामुळे अनेक पक्षी मरण पावतात या कारणाने निखिलने विविध प्रकारचे फळांची बियांचे सिड्सबॉल तयार करून विविध ठिकाणी रोपन करणार आहे. सिड्सबॉल तयार करण्यासाठी निखिलला गावातील लहान वृक्ष प्रेमी हात भार लावत आहेत.