वाशिम:  बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशीम जिल्ह्यातील  पोहरादेवीच्या  विकासाकामासाठी राज्य सरकारने  हिवाळी अधिवेशनात नुकताच 25 कोटी रुपयांची निधी घोषित केला आहे. पोहरादेवी  येथे येणाऱ्या देशभरातील भाविकांना सुविधा मिळाव्यात या करता  हा  विकास निधी खर्च केला जाणार आहे. 


पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून विविध विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधीतून 5 कोटी 25 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश 9 जानेवारीला ग्रामविकास विभागाने काढला आहे.  बंजारा समाजाची कशी असलेल्या वाशीम जिल्ह्यातील  पोहरादेवीच्या  विकास कामासाठी राज्य सरकारने  हिवाळी अधिवेशनात  नुकताच 25 कोटी रुपयांची निधी घोषित केला होता .


रामनवमीनिमित्त जगदंबा देवीची मोठी  यात्रा   असते.  या यात्रेत  देश विदेशातील बंजारा भाविक  नतमस्त होण्यासाठी  बंजारा काशी पोहरादेवी येत असतात.  मात्र मुलभूत सुविधा नसल्याने  भाविकांना  राहण्याची सोय उपलब्ध  होत नाही. प्रशस्त  पार्किंग,  मोठे रस्ते,  वीज, पाणी  या सुविधा  उपलब्ध  करून देण्यासाठी  हा निधी उपलब्ध झाला आहे. पोहरादेवीच्या विकासासाठी  शासन प्रशासन दरबारी  मोठ्या  प्रयत्नातून  हा निधी  मिळाला आहे.  


जिल्हाधिकऱ्यांनी मे महिन्यात निधी मागणीचे पत्र शासनाकडे पाठविले होते. त्यानुसार यंदाच्या आर्थिक वर्षांत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या निधीतून उपरोक्त निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून चालू कामांना गती मिळणार आहे. सदर निधी प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांवरच खर्च करण्याच्या सूचना देखील ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोहरादेवी आणि उमरी खुर्दच्या सर्वांगीण विकासाकरिता तब्बल 393 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी येत्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागणार आहेत.


वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी इथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. रामनवमीच्या औचित्यावर संत सेवालाल महाराजांची भव्य यात्रा भरते. पोहरादेवी यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. संपूर्ण बंजारा बांधवांचे दैवत असलेल्या सेवालाल महाराजांच्या यात्रेसाठी लाखो भाविक पोहरादेवी या ठिकाणी दाखल होत असतात. संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी येऊन नतमस्तक होतात. या ठिकाणी दर्शन घेतात. नवस फेडतात. म्हणून बंजारा समाजातील प्रत्येक नागरिकांच्या घराघरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज, संत बाबूलाल महाराजांचा फोटो लावून पोहोरादेवीची पूजा करतात.