Washim News: मसाला पीक म्हणून हळदीचं महत्व खूप जास्त आहे.  देशात हळद उत्पादित करणारं महाराष्ट्र (Maharashtra Haldi farming) हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.  तर तेलंगाणामध्ये सर्वाधिक हळदीचं उत्पादन होतं.  मात्र सध्या महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आल्याचं चित्र आहे. कारण हळद पिकावर पडलेला करपा रोग शेतकऱ्यांचं उभं पीक उध्वस्त करत आहे. राज्यात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळद पीक पेरा केला जातो, मात्र बदलत्या वातावरणामुळे  हळद पीक चांगलंच संकटात आलं आहे.


 गेल्या 2 वर्षांपासून  बदलत्या  हवामानामुळे हळद पीक संकटात


वाशीम जिल्ह्यात सहा हजार 112 हेक्टर क्षेत्रावर हळदीचा पीक पेरा केला आहे. नकद पीक म्हणून हळद पिकाकडे काही दिवसांपासून शेतकरी आकर्षित  झाले आहेत. मात्र  गेल्या 2 वर्षांपासून  बदलत्या  हवामानामुळे हळद पीक संकटात आलं आहे. राज्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात धुक्याची दाट चादर पहावयास मिळत आहे. या  पडलेल्या  धुक्यामुळे  सर्वच रब्बी पिकावर परिणाम पहावायस मिळत आहे. मात्र  हळद पिकावर त्याचा  जास्त परिणाम दिसतोय. हळदीवर बुरशीजन्य आजार म्हणून करपा रोग पडला असून चांगलं हिरवी दिसणारी हळद पिकाची पानं आता करपू लागली आहेत. त्याचा परिणाम आता हळदीच्या उत्पादनावर होणार असल्याचं चित्र आहे.  


अतिपावसाने हळद पिकावर परिणाम


पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच अतिपावसामुळं हळद पिकावर परिणाम पहावयास मिळू लागला होता. त्यातून कशी बशी हळद रासायनिक फवारणी आणि खते देऊन वाचवली. मात्र गेल्या  काही दिवसांपासून ढगाळ वातावरण  आणि डलेल्या  धुक्याने  हळद पीक धोक्यात आलं आहे. सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी मदत  द्यावी  अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 


नगद पीक  म्हणून हळद पिकाला चांगली मागणी असून भाव चांगला मिळत असल्याने  शेतकरी  आता  पारंपारिक पीकं बाजूला  करत मसाला  पीक म्हणून  हळद उत्पादनाकडे वळले आहेत.  मात्र हळदीवर  पडलेल्या करपा रोगाने आता शेतकरी चांगलाच हैराण झाला आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देऊन शेतकऱ्यांवरील आलेलं संकट दूर करावे अशी अपेक्षा  शेतकरी वर्ग करू लागला आहे. 


ही बातमी देखील वाचा


Sharad Pawar on Shivsena: कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत, शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यय येईल; शरद पवारांचा सूचक इशारा