वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील सोयजना गावातील राहणाऱ्या विद्यार्थिनी अवंतिका मिसाळ हिने वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' मध्ये घवघवीत यश मिळविले आहे.  तिने 720 पैकी 610 गुण मिळविले असून कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय तिने हे यश मिळवले आहे, हे उल्लेखनीय. घरची हलाखीची परिस्थिती वडिलांनकडे केवळ 2 एकर शेती असून ललित मिसाळ यांनी मोलमजुरी करून अवंतिकाला अभ्यास करण्यासाठी मोबाईल घेऊन दिला आणि त्यावर अभ्यास करत हे यश प्राप्त केला. अवंतिका हिने इच्छाशक्तीच्या जोरावर 720 पैकी 610 गुणांचा टप्पा पार केला आहे. तिच्या या कामगिरीबद्दल तिचे जिल्ह्याभरात कौतुक होत आहे.


नीट परीक्षेत नागपुरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी


नागपूरः नुकताच नीटचा निकाल जाहीर झाला असून यात नागपूरच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दिक्षाभूमीचा ऋषिकेश चव्हाण हा नीटच्या परीक्षेत शहरातून प्रथम आला आहे. ऋषिकेशने नीट परीक्षेत 720 पैकी 690 गुण प्राप्त केले. त्याचे ऑल इंडिया रँक 253 वे आहे. तर कॅटेगिरीमध्ये त्याने देशात 50 वे स्थान मिळवले आहे.


गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नागपूरच्या विद्यार्थ्यांनी दमदार प्रदर्शन केले असून अखिल भारतीय स्तरावर समाधानकारक रँक प्राप्त केली आहे. त्यानंतर अथर्व राठी या विद्यार्थ्याने 513 वे रँक प्राप्त करीत शहरातून द्वितीय स्थान प्राप्त केले. 599 रँक प्राप्त करणारा अश्मित मिश्रा हा तिसऱ्या स्थानी आहे. याशिवाय वैष्णवी बालपांडेने 657 वी रँक प्राप्त केली आहे. तर सार्थक पाखमोडे या विद्यार्थ्याने 680 गुण प्राप्त केले आहे.


यंदाच्या निकालात नागपूर जिल्ह्यात घसरण


एनटीएकडून घेण्यात आलेल्या नीट परीक्षेसाठी नागपूर शहरात 18 केंद्रांवर 22 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावर्षी जिल्ह्यात नीटच्या निकालात घसरण दिसून आली. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मेडिकल अभ्यासक्रमात 350 प्रवेश कमी होतील. गेल्यावर्षी 1200 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळविला होता. पण यावेळी 650 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्यामागे कोरोनाचे कारण दिले जात आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी योग्य तयारी करु शकले नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Crop Loan : शेतकऱ्यांना कर्ज देताना मानवीय दृष्टिकोन ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना आवाहन


Pollution Control : प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करा , औष्णिक वीज प्रकल्पांना दोन वर्षांची मुदतवाढ


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI