Washim Snakebite News : वाशिमच्या (Washim) रिसोड तालुक्यातील शेलुखडसे गावातून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. यात शनिवार शाळेला अर्धा दिवस सुट्टी असल्याने गणेश खडसे यांनी आपल्या 9 वर्षीय वेदांत नावाच्या मुलालाही शेतात नेलं. यावेळी सगळं कुटुंबीय रब्बी हंगामाच्या शेतीच्या कामात व्यस्त होतं. मात्र याच वेळी काळानं घा केला आणि काम सुरू असताना अचानक एका विषारी सापाने वेदांतला दंश (Snakebite Accident) केल्याची घटना घडली. यात 9 वर्षीय वेदांतचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. हि घटना निवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून गावात एकच शोककळा पसरली.

Continues below advertisement

Snakebite News : नऊ वर्षीय चिमुकल्याचा उपचारापूर्वी वाटेतच दुर्दैवी मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात कांदा लागवडीचे काम सुरू असताना कांदा भरलेल्या पिशवीच्या बाजूला दबा धरून बसलेल्या विषारी सापाने शिकार समजून वेदांतला दंश केला. सर्प दंश झाल्याच कळताच वेदांतने आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर वडिलांनी ताबडतोब सापाचा शोध घेत त्याला मारून टाकले. मात्र, सर्प दंश झालेल्या वेदांतला विष अंगात चढत असल्याने प्रथम रिसोड इथं उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, अंगात विष पूर्णतः पसरल्याने वाशिम इथं नेण्याचा सल्ला दिला असता वाशिम इथं उपचाराला नेताना रस्त्यात वेदांतचा मृत्यू झाला. दरम्यान वेदांतचा मृत्यू बाबत बातमी कळताच गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Continues below advertisement

Palghar News : आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार; रुग्णांसाठी असलेल्या बेडवर चक्क कुत्र्यांचा आराम

पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे . पालघरच्या जव्हार मोखाडा या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नाही याची ओरड वारंवार होत असतानाच मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील रुग्णालयातील रुग्णांसाठी असलेल्या बेडवर कुत्रे झोपत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . खोडाळा येथील रुग्णालयात बेडवर कुत्रे झोपले असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला असून यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय . एकूणच यामुळे रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून या सगळ्या प्रकारामुळे येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे .

आणखी वाचा