Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 2 नोव्हेंबरचा दिवस आहे. त्यानुसार, अवघ्या काही तासांतच आज दुपारी 1 वाजून 21 मिनिटांनी शुक्र (Venus) ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह तूळ राशीत 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 27 मिनिटांपर्यंत विराजमान असणार आहे. शुक्र ग्रहाचं हे राशी परिवर्तन सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) प्रभाव टाकणार आहे. शुक्र ग्रहाचा हा प्रभाव शुभ किंवा अशुभ होऊ शकतो. 

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाचं संक्रमण कोणकोणत्या राशींसाठी अशुभ ठरणार, नकारात्मक ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शुक्र ग्रहाचं तूळ राशीत होणारं संक्रमण वृषभ राशीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या राशीच्या सहाव्या चरणात हे संक्रमण होणार आहे. शुक्र ग्रह शत्रू, आरोग्य आणि जबाबदारीचा कारक तसेच, प्रतिनिधीत्व करणारा ग्रह मानतात. शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्यावर आणि जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 

Continues below advertisement

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र ग्रहाचं हे संक्रमण तूळ राशीत आहे. तूळ राशीच्या पहिल्या चरणात हे संक्रमण होणार आहे. या भावामुळे तुमचं व्यक्तित्व, आकर्षण आणि आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. या काळात कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा. तसेच, कोणताही निर्णय घेताना आत्मविश्वास टिकवून ठेवा. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

शुक्र ग्रहाचं तूळ राशीत होणारं संक्रमण वृश्चिक राशीच्या बाराव्या चरणात होणार आहे. या चरणात असल्यामुळे आरोप, अभियोग, आध्यात्मिकता या बाबतीत विचार केला जातो. शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊन तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. यामुळे तुम्हाला या काळात संयम ठेवण्याची गरज आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                                                  

Astrology Yog : 3 नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवा! तब्बल 10 वर्षांनंतर गुरु-शुक्राच्या युतीने जुळून येणार दृष्टी योग; बॅंक बॅलेन्समध्ये दुप्पट वाढ