Shahrukh Khan: जगभरात 2 नोव्हेंबर हा दिवस SRK डे म्हणून साजरा केला जातो.सुपरस्टार शाहरुख खान त्याचा 60 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमले आहेत. यंदाचा SRK डे मात्र फॅन्ससाठी अधिक खास ठरला आहे. कारण, शाहरुख खानच्या वाढदिवशी (Shahrukh Khan Birthday) दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्यांच्या बहुचर्चित चित्रपट ‘किंग’चा टायटल रिव्हील व्हिडिओ रिलीज केला आहे. या व्हिडिओत शाहरुखचा दमदार लूक दाखवण्यात आला आहे. ‘पठाण’नंतर सिद्धार्थ आनंद आणि शाहरुख खान यांची ही दुसर एकत्र काम आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होणारा हा सिनेमा 2026 साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (King Title Video Release)
किंग खानचा आगळा वेगळा अवतार(King Title Video Release)
‘किंग’ हा एक स्टायलिश आणि थरारक अॅक्शन एंटरटेनर असणार आहे, जो स्टाइल, करिश्मा आणि थ्रिलचा नवा अनुभव देईल. सिद्धार्थ आनंदच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि मसालेदार फिल्म मानली जात आहे, जी त्यांच्या अॅक्शन स्टोरीटेलिंगला एका नव्या लेव्हलवर नेणार आहे.
शाहरुख खानच्या लूककडे पाहिलं तर तो पूर्णपणे ‘सॉल्ट अँड पेपर’ म्हणजेच ग्रे हेअर लूकमध्ये दिसतोय. कानात बाली, नाकातून वाहणारं रक्त आणि ओठात दाबलेला पत्ता हा सगळा लूक त्याला आणखी इंटेन्स आणि जबरदस्त बनवतो. या अवतारात शाहरुख एकदम भयानक, स्टायलिश आणि रॉ लुकमध्ये दिसतोय, ज्याने फॅन्सना अक्षरशः वेड लावलं आहे.
‘किंग’चा टायटल रिव्हील म्हणजे शाहरुख खानच्या ओळखीचा, त्यांच्या आयकॉनिक व्यक्तिमत्त्वाचा जल्लोषच आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदकडून हा फॅन्सना दिलेला एक विशेष वाढदिवसाचं गिफ्ट म्हणावं लागेल. वाढदिवसाच्या दिवशी रिलीज झालेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुखचा चार्मिंग अंदाज, प्रचंड एनर्जी आणि त्याचा दमदार डायलॉग – “सौ देशो में बदनाम, दुनीयाने दिया एकही नाम… किंग!” फॅन्सना अक्षरशः थरारून टाकतो.‘पठाण’नंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ आनंद आणि शाहरुख खानची ही जोडी मोठ्या पडद्यावर धमाका करणार याची खात्री फॅन्सना वाटतेय. ‘किंग’ २०२६ मध्ये रिलीज होणार असून, या सिनेमाची आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहेत.