वर्धा : वर्धा जिल्ह्यात आज ओबीसी मेळावा (OBC Sabha) आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्यात अपेक्षित गर्दीत जमली नसल्याने 90 टक्के खुर्च्या खाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आयोजकांकडून 25 हजार ओबीसी समाजबांधव या सभेला उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात सभेच्या ठिकाणी 300 ते 400 लोकांची गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ओबीसी मेळाव्याकडे ओबीसींनी पाठ फिरवल्याची चर्चा सभास्थळी पाहायला मिळत आहे.


वर्धा जिल्ह्यात आज ओबीसी मेळावा होत असून, या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित असणार आहे. अकरा वाजता सुरू होणारी ही सभा, दुपारी एक वाजता सुरू झाली. मात्र, तरीही सभेच्या ठिकाणी गर्दीच नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, छगन भुजबळ वर्धा शहरात दाखल झाले असून, मुख्य नेत्यांचे भाषण देखील सभास्थळी सुरू झाले आहे. मात्र, सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खुर्च्यांवर, मोजक्याच लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.



वडेट्टीवार यांनी सभेत येणं टाळले...


जालना येथे झालेल्या पहिल्या ओबीसी मेळाव्यात काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हजेरी लावली होती. मात्र, या सभेत छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणामुळे वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, झालेल्या एकही ओबीसी सभेत वडेट्टीवार उपस्थित राहिले नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर, आज वर्ध्यात होत असलेल्या सभेत देखील वडेट्टीवार आणि काँग्रेस पक्षाच्या ओबीसी नेत्यांनी लांब राहणे पसंद केले. 


अशी करण्यात आली होती सभेची तयारी...


राठा समाजाला आरक्षण मिळावे; पण ते ओबीसींच्या प्रवर्गातून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसोबतच शिंदे समिती बरखास्त करून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, या मागणीकरिता आज वर्ध्यातील जुन्या आरटीओ ऑफिसच्या मैदानावर ओबीसी भटके विमुक्त समाजाची महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला येणाऱ्याच्या वाहनाकरिता पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रपूर, यवतमाळ, पुलगाव या मार्गान येणाऱ्यांकरिता सर्कस ग्राऊंड तर नागपूर, अमरावती व आर्वी मार्गाने येणाऱ्या वाहनांकरिता स्वावलंबी शाळेच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. सोबतच, या सभेला 25 हजार लोकांची गर्दी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु, अपेक्षित प्रतिसाद या सभेला मिळालाच नसल्याचे पाहायला मिळाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : 'एडपट, माझ्या नादी लागू नको'; मनोज जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल