Wardha News Update : वर्धा येथील पुलगाव पोलीस ठाण्याअंर्गत येणाऱ्या गाडगे नगर पुलगाव येथील एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या युवकाकडून गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. युधिश्टीर उर्फ बाळा शंकरराव थोरात (वय 32) असे या युवकाचे नाव आहे.


थोरात हा पुलगाव शहरामध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा आपल्या घरी बाळगून असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांना मिळलेली होती. त्यामुळे कुठलाही गंभीर गुन्हा घडण्यापूर्वी आरोपीला अटक करून त्याच्याकडील शस्त्र जप्त करणे गरजेचे होते. पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आली. 
 
थोरात हा गाडगे नगर पुलगाव येथे कमरेला गावठी कट्टा लावून फिरत होता. त्याच्यावजळ तीन जिवंत काडतुसे देखील होती. या काडतुसांची किंमत जवळपास 75,000 रुपये आहे. त्यामुळे थोरात याच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियमच्या कलम 3, 25 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


संशयितावर खुनासारखे गंभीर गुन्हे  


संशयित आरोपी खरात हा वर्धा शहरातील रहिवासी असून त्याच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात खुनासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याने गावठी कट्टा कशासाठी आनला होता? याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.


जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून  विविध ठिकाणी सततच्या हत्येच्या व चोरीच्या घटनांनी शरवासीय धास्तावले आहेत. पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आव्हान आहे. आज पुलगाव पोलिसांकडून अशाच प्रकारचा गुन्हा धडण्याआधी खबरदारी घेतली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात  असल्याने नागरिकांमधून काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे. 


ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंग पाटील पुलगाव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण, खुषाल राठोड, राजेंद्र हाडके, महादेव सानप, दिपक डगवार, विनोद रघाटाटे, संजय पटले, पंकज टोकोणे, मंगेष तराळे, मुकेष वांदीले, शरद सानप, जयदिप जाधव, प्रदिप सहाकाटे, रत्नाकर पांडे यांनी कारवाई केली असून पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.