वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथे धक्कादायक घटना घडली आहे.सालोड हिरापूर येथील सूरज बावणे या तरुणानं नवीन डीजे खरेदी केला होता. जन्माष्टमीची ऑर्डर मिळाल्यानं एक दिवस अगोदर सूरज बावणे यानं आवाजाची चाचणी घेण्यासाठी मुख्य वीज वाहिनीवरुन वीज कनेक्शन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी विजेचा धक्का बसल्यानं सूरज बावणे याच्यासह सेजल बावणे या 13 वर्षांच्या मुलाचा देखील मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथे नवीन डीजेची चेकिंग दोघांच्या जीवावर बेतली आहे. विद्युत प्रवाहाच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. सालोड येथील घटना घटनेने खळबळ उडाली. विजेचा धक्का बसल्यानं ते दोघे तारेला रात्रभर चिकटून राहिले होते.
वर्ध्याच्या सालोड हिरापूर येथे नवीन आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी मुख्यवाहिनी वरून थेट विद्युत पुरवठा करण्याचा प्रयत्न जीवावर बेतला. विजेचा धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सालोड (हिरापूर) येथे घडली.सूरज चिंदूजी बावणे वय 27 वर्षे, सेजल किशोर बावणे वय 13 वर्ष अशी मृतांची दोन्ही रा. सालोड (हिरापूर) नावे आहेत.
सूरज बावणे यांनी नवीन डीजे आणि धमाल पार्टी तयार केली होती. बावणे यांना सोमवारी जन्माष्टमी असल्याने त्याची ऑर्डर मिळाली होती. नव्याने आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी सेटअप तयार करून त्यांनी विद्युत जोडणी सुरू केली. या साठी त्यांनी विद्युत तारांवरून थेट विद्युत पुरवठा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात सूरज आणि सेजल या दोघांना विजेचा धक्का बसला. दोघेही विद्युत तारांना चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही रात्रभर तारांना चिकटलेल्या अवस्थेतच राहिले. सकाळी घरच्यांच्या लक्षात आल्याने खळबळ उडाली असून, याप्रकरणी सावंगी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
एक चूक भोवली
सूरज बावणे यांनी नव्यानं आणलेल्या डीजेच्या आवाजाची चाचणी करताना थेट मुख्य वाहिनीवरुन वीज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजेच्या धक्क्यानं दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बावणे यांच्या घराजवळ मोठ्या संख्येनं लोक जमले होते.
इतर बातम्या :
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड