वर्धा : धावत्या रेल्वेत चढताना पाय घसरल्यामुळे तरूण फलाट आणि रेल्वेच्या मध्ये अडकला. परंतु, रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे तरूणाचे प्राण वाचले आहेत. अनिल सीताराम तुमसरे(वय 29) असं प्रवाशाचं नाव असून या घटनेत तो जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. वर्धा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे.  
 
आज सकाळी  साडेआठ वाजता एक्सप्रेस गाडी वर्धा रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक  एकवर आली. 8 वाजून 35 मिनिटांनी गाडी स्थानकावरून निघत असताना अनिल याने चालती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो रेल्वे आणि फलाटाच्या मध्ये गपमध्ये फसला. हे थरारक दृश्य आरपीएफ जवान एस. डी. डीगोले यांना दिसताच त्यांनी त्वरित त्या प्रवाशाकडे धाव घेतली आणि महिला प्रवासी सुशिला वायाम या दोघांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनिला याला शिताफीने बाहेर खेचलं. त्याला प्लॅटफॉर्म वर ओढून  त्याचा जीव वाचवला. वर्धा रेल्वे स्थानकावरील हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.  


दोन महिन्यात पाच प्रवाशांचा जवानांनी वाचवला जीव   


धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करताना रेल्वेखाली गेलेल्या, रेल्वे आणि प्लॅटफॉर्म मध्ये फसलेल्या प्रवाशांना अरपीएफ जवानांमुळे नवजीवन मिळाले आहे. आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात आरपीएफ  स्टेशन वर्ध्याचे निरीक्षक आर एस मीना यांच्या टीमने मागील दोन महिन्यात पाच प्रवाशांचा जीव वाचवला आहे. जवानांच्या या कार्याचं सर्वच स्तरातून कौतुकास्पद होत आहे.  


प्रवाशांना आवाहन


दरम्यान, धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन अरपीएफ जवानांकडून प्रवाशांना करण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या


Wardha News : अमरावतीत मुसळधार पाऊस, अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडले 


Wardha Rain Updates : वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन