Walmik Karad Surrender : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपा सुरू आहे. त्यातच, आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik karad) आज सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सीआयडीने त्याला अटकही केली आहे. 


दरम्यान, या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. केज कोर्टात आज सुनावणी करण्यासाठी सीआयडी तर्फे विनंती केली असता न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याची माहिती पुढे आली आहे. वाल्मिक कराडच्या रिमांडसाठी आजचं केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज (31 डिसेंबरला) संध्याकाळी  7.30 नंतर सुनावणीसाठी सीआयडीने विनंती केली होती. या विनंतीला न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय सुनावणी होते याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.    


पुणे कार्यालयात शरण येण्यापूर्वी काय काय घडलं?


वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार अशा २ दिवसांपूर्वी चर्चा


सकाळी ७ वाजता: पुण्यातील सी आय डी ऑफिस बाहेर आज वाल्मिक कराड याचे कार्यकर्ते आले एकत्रित


सकाळी ९ वाजता: सी आय डी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त


सकाळी १० वाजता: पुणे पोलीस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि  गुन्हे शाखेचे उपयुक्त निखिल पिंगळे सी आय डी ऑफिस बाहेर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल


सकाळी ११ वाजता: १२ ते १ दरम्यान वाल्मिक कराड सी आय डी  कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर


दुपारी १२ वाजता: पुणे सी आय डी कडे सरेंडर करणार असल्याचे स्वतः वाल्मिक कराड याने व्हिडिओ केला शेयर


दुपारी १२. १५ वाजता: MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वाल्मीक कराड सी आय डी ऑफिस मध्ये दाखल


दुपारी १ वाजता: सी आय डी चे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडून वाल्मीक कराड ची चौकशी सुरु


तर मी शिक्षा भोगायला तयार - वाल्मिक कराड


मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा


Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह