माद्रिद (स्पेन): भारताच्या माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदनं स्पेनमधल्या मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. आनंदनं अंतिम सामन्यात चीनच्या वुई यीवर मात करुन नवव्यांदा स्पेन मास्टर्स स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गाजवला.
आनंदनं 1996 साली पहिल्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. या स्पर्धेनंतर आता विश्वनाथन आनंद 17 जूनपासून बेल्जियममध्ये सुरु होणाऱ्या ग्रँड चेस टूर स्पर्धेत सहभागी होणार आहे.
दरम्यान याआधी आनंदनं फिडे कँडिडेट्स चेस टूर्नामेंटमध्ये जेतेपद मिळवलं होतं. हे जेतेपद मिळवून त्यानं आपल्या टीकाकारांची तोंडं बंद केली होती.