मुंबई : गीरच्या अभयारण्यात तब्बल शंभर सिंहीणी गर्भवती असल्याचे वृत्त समोर आल्याने वनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


 

गीर अभयारण्यामधील एसीएफ नवल अपारनाथी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गीर अभयाण्यात १२५ सिंहीणी आहेत. यापैकी शंभर सिंहीणी गर्भवती आहेत. यामुळे गीर अभयारण्यातील सिंहांच्या संख्येत वाढ होणार आहे.

 

एक सिंहीणी या २ ते ४ छाव्यांना जन्म देते. त्यामुळे आगामी काळात गीरमधील सिंहांच्या संख्येत २०० ते ४०० ने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

२०१० मधील गणनेनुसार गीरमध्ये ४११ सिंहांची संख्या होती. त्यानंतर २०१५ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार गीरमधील सिंहांच्या संख्येत वाढ होऊन ५२३ झाली होती. सध्या या अभयारण्यात ७०० सिंहांची संख्या आहे.

 

वन आधिकाऱ्यांच्या मते प्रत्येक ६ सिंहीणींमागे ५ गर्भवती आहेत. त्यानुसार १२५ सिंहीणीपैकी शंभर सिंहीणी गर्भवती असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

या सिंहीणीच्या प्रसूतीचा काळ जवळ आला असल्याने १६ जून ते १६ ऑक्टोंबर दरम्यान पर्यटकांना गीर अभयारण्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे.