Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. वनिताने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता वनिताला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्याची इच्छा आहे.
वनिता खरात काय म्हणाली?
वनिता सकाळला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली की,"हिंदी सिनेसृष्टीतून मला खूप ऑफर्स येत आहेत. पण हातातल्या कामांमुळे मी त्यांना नकार देत आहे. मला हिंदी किंवा मराठी एका विशिष्ट भाषेत काम करायचं नाही. मला टॉलिवूड प्रचंड आवडत असून आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्याची माझी इच्छा आहे. पण दाक्षिणात्य प्रोजेक्ट मला कधी मिळेल माहित नाही. मराठी भाषा माझा कम्फर्ट झोन आहे. पण आता मला कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायचं आहे".
वनिताला अनेकदा ट्रोल वेगवेगळ्या कारणाने ट्रोल केलं जातं. आता ट्रोलिंगवर भाष्य करत वनिता म्हणाली, “मला अजिबात ट्रोलिंगचा त्रास होत नाही. मी एकदा पोस्ट शेअर केली की त्याकडे पुन्हा बघतदेखील नाही. त्यावर किती लाईक्स कमेंट्स आल्या हे बघत नाही. त्यामुळे ट्रोलिंगचा मला फरक पडत नाही".
वनिता खरात सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा 'सरला एक कोटी' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात वनिता ओंकार भोजने आणि ईशा केसकरसोबत झळकली होती. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित होता.
वनिता खरात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपूर्वी वनिता न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. अनेकांनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं. तर दुसरीकडे अभिनेत्रीवर प्रचंड टीका झाली. पण आता सध्या ती खाजगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. वनिता नुकतीच सुमित लोंढेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. वनिता आणि सुमितच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आता वनिताच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. वनिताला साऊथमध्ये पाहायला चाहते उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या