दिल्लीची पुण्यावर सात धावांनी मात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2017 12:02 AM (IST)
NEXT
मुंबई : मनोज तिवारीनं प्रयत्नांची शर्थ करुनही पुण्याला दिल्लीकडून सात धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दिल्लीनं पुण्याला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पुण्याला वीस षटकांत सात बाद 161 धावांचीच मजल मारता आली.
त्या लक्ष्याचा पाठलाग करताना मनोज तिवारीनं 45 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 64 धावांची खेळी केली. स्टीव्ह स्मिथनं 38 आणि बेन स्टोक्सनं 33 धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली.
पण झहीर खान आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन विकेट्स काढून पुण्याला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याआधी, या सामन्यात सलामीच्या करुण नायरच्या 64 धावांच्या जोरावर दिल्लीनं 20 षटकांत आठ बाद168 धावांची मजल मारली होती.
करुण नायरनं 45 चेंडूंत नऊ चौकारांसह 64 धावांची खेळी उभारली. ऋषभ पंतच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 74 धावांची आणि मार्लन सॅम्युअल्सच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी रचली. पंतनं 36 धावांची, तर सॅम्युअल्सनं 27 धावांची खेळी केली. दिल्लीनं पुण्याला हरवून आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 13 सामन्यांमधला सहा विजय साजरा केला.
दिल्लीच्या खात्यात आता 12 गुण झाले असले तरी त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात आलं आहे. पुण्याचा हा 13 सामन्यांमधला पाचवा पराभव ठरला. पुण्यानं आठ विजयांसह 16 गुणांची कमाई केली असून, प्ले ऑफच्या शर्यतीत पुणे तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -