शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी संपाला संपूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्याच्या लढ्याची ही सुरुवात आहे. शेवटची मागणी मान्य होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र करत महाराष्ट्र बंद ठेवला आहे. या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. शिवाय या बंदला अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.
संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
- शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.
- शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी.