मुंबई : माझ्यावर मंत्रिमंडळाने आणि सभागृहाने जो विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर मी सर्व जनतेचे देखील आभार मानतो. त्यांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. इथं येताना दडपण होतं, कारण इथं कसं वागायचं हे मला ठाऊक नव्हतं, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आपलं पहिलं भाषणं केलं. बाळासाहेबांमुळे आम्ही आलो, त्यांना वंदन केल्याशिवाय आम्ही कोणतंही कामकाज करत नाहीत, त्यामुळे माझ्या आई-वडिलांची पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक जन्मात शपथ घेईन, असेही ते म्हणाले.

विश्वासदर्शक ठरावाची चाचणी मोठ्या विश्वासानं जिकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानत विधानसभेत पहिलं भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या सरकारवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व आमदारांचे आणि त्याचबरोबर जनतेचे आभार मानले. जनतेच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते असेही ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मी मैदानातला माणूस आहे. सभागृहात कसं होईल याची मला चिंता होती. पण इथं आल्यावर कळलं मैदानातच चांगलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजपाने घातलेल्या गोंधळावर टीका केली. मी समोरा-समोर लढणारा आहे. शत्रूला अंगावर देखील घेणार आहे, असेही ते म्हणाले.

मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांची पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक जन्मात शपथ घेईन. जो आपल्या दैवताला मानत नाही आई-वडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि विरोधकांवर टीका केली. सभागृहाच्या कामकाजाची पद्धत बाजूला ठेवून नको ते विषय इथे माडंले गेले, हा महाराष्ट्र नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकार पास

महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी अखेर पार पडली. या बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकार पास झाले आहे. या चाचणीत महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी मतदान केलं तर विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केलं. तर चार सदस्य तटस्थ राहिले. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुपारी 2 वाजता विधानसभेचं कामकाज सुरु झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.