वसई : विरारमध्ये अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. एका निर्जनस्थळी पीडित मुलीच्या मित्राला झाडाला बांधून, 2 अनोळखी इसमांनी पीडित मुलीला झुडुपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. सध्या पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
पीडित मुलगी आपल्या घरातून मावस बहिणीकडे जात होती. दरम्यान तिला रस्त्यात तिचा मित्र भेटला. मित्रासोबत बोलत असताना दोन अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि पीडित मुलीच्या मित्राला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्यांनी मुलाला झाडाला बांधलं. त्यानंतर आरोपींनी मुलीला बाजूला झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तेथून फरार झाले.
विरार पूर्वेकडील जीवदानी रोडवरील भास्कर वामन ठाकूर शाळेच्या पाठीमागे निर्जन स्थळावर 15 एप्रिलच्या रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत काल रात्री 376 (ड), 523, 506 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3 व 6 प्रमाणे अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
पालघरमधील विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Apr 2019 11:43 PM (IST)
मित्रासोबत बोलत असताना दोन अनोळखी इसम त्याठिकाणी आहे आणि पीडित मुलीच्या मित्राला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्यांनी मुलाला झाडाला बांधलं. त्यानंतर आरोपींनी मुलीवर बलात्कार केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -