श्रीनगर : काश्मीरच्या श्रीनगर आणि उधमपूर या दोन मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे. श्रीनगरमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये अवघं सात टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदानाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला श्रीनगरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने युवा चेहरा म्हणून खालीद जहांगीर यांना रिंगणात उतरवलं आहे. तर उधमपूर मतदारसंघात भाजपचे नेते एम ओ राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि काँग्रेस कडून स्वर्गीय राजा हरिसिंग यांचे वंशज विक्रमादित्य यांच्यात लढाई असणार आहे.
श्रीनगरमधल्या या मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या तब्बल दीडशे तुकड्या या दोन मतदारसंघांसाठी काश्मीर खोऱ्यात रवाना झाल्या आहेत. काश्मीरमध्ये एकूण लोकसभेच्या सहा जागा आहेत. दहशतवाद्यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आवाहन केलं आहे. त्यामुळे उद्याचा दिवस श्रीनगर आणि एकूणच काश्मीरमधल्या प्रशासनासाठी आव्हानात्मक असणार आहे.
काश्मीर खोऱ्यातल्या मतदानाकडे देशाचं लक्ष, श्रीनगर-उधमपूरमध्ये कडेकोट सुरक्षा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Apr 2019 09:21 PM (IST)
श्रीनगरमधल्या या मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या तब्बल दीडशे तुकड्या या दोन मतदारसंघांसाठी काश्मीर खोऱ्यात रवाना झाल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -