Mumbai Hotel Taj Mahal Palace : मुंबईच्या हॉटेल ताजजवळ एकाच नंबरच्या दोन एक सारख्या गाड्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी 10:30 वाजताच्या सुमारस ताजमहल हॉटेलच्या बाहेर एकसारख्या नंबर प्लेट असलेली दोन वाहने आढळून आल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. तर ही वाहने संशयास्पद असून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तात्काळ ताज हॉटेल गाठले. त्यानंतर या वाहनांची तपासणी केल्यानंतर या गाडीचे मालक शागीर अलीच्या तक्रारीवरुन कुलाबा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरात एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या आढळून आल्या. या संदर्भात कुलाबा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मूळ गाडीचे मालक असलेले शागीर अली यांनी ही गाडी ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरामधून पकडली. त्यानंतर पोलिसांना या संदर्भात माहिती देत यासंदर्भात गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. शागीर आली यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वीच डुबलीकेट नंबर प्लेटच्या संदर्भात आरटीओ कडे तक्रार दाखल केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना खोटे चालान त्यांना भरावे लागत होते. या सगळ्या आर्थिक भुर्दंडाच्या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु आज डुबलीकेट नंबर प्लेट असलेले गाडी त्यांना सापडली आणि त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेत या सगळ्या संदर्भाची तक्रार केलेली आहे. मुंबईतील कुलाबा पोलिस स्थानकात या गाड्या आणि आरोपी फिर्यादी आणण्यात आले आहे.
आपल्या वाहनावर बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या चालकाने पोलिसांना सांगितले की, तो कर्ज फेडण्यास सक्षम नाही, म्हणून त्याने त्याच्या वाहनाचा शेवटचा क्रमांक 3 होता तो 8 करून बदलला. यातील मूळ वाहन क्रमांक MH01EE2388 या प्रकरणातील संशयित आरोपी चालकाचा कार क्रमांक MH01EE2383 असा असल्याने त्याने शेवटी 3 चे 8 मध्ये रूपांतर केले होते.
पोलीस तपासात पुढे आले विचित्र कारण
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, दोन वाहनांपैकी एक साकीर अलीच्या मालकीचा असल्याचा दावा केला आहे. तर साकीर अलीचेच मित्र असलेल्या योगेंद्र शर्मा आणि संदीप यादव यांनी सांगितले की, अनेकवेळा त्यांचे मित्र ज्या मार्गावर जात नव्हते. चालानही त्याच्या मित्राच्या गाडीवर यायचे. एकदा आमच्या मित्राच्या ड्रायव्हरने ते दुसरे वाहन पाहिले, त्यानंतर त्याने त्याचा फोटो काढून अलीला पाठवला आणि तो फोटो आमच्या ग्रुपमध्ये प्रसारित केला. दरम्यान, आम्हा सर्वांची मदत मागितली की हे वाहन कुठेही दिसल्यास माहिती द्यावी. कारण त्यामुळे त्यांना अनेक वेळा ई-चलन मिळत आहे.
दरम्यान, आज 11:30 च्या सुमारास आमचा मित्र एका प्रवाशाला ताज हॉटेलजवळ उतरवत असताना त्याला ही दुसरी कार दिसली. तो त्याच्या कारमधून बाहेर आला आणि ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. सोबतच गाडीच्या मागे धावला आणि तिच्या ट्रंकलाही धडकला, पण तो थांबला नाही. गाडी जवळच असलेल्या टॅक्सी ड्रायव्हरनेही कार थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो गाडी थांबवत नव्हता. त्यानंतर अलीने तिथे उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले की तो कारचोर आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला थांबवले. सध्या दोघेही पोलीस ठाण्यात असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
बाईक चालकाची कचऱ्याच्या गाडीला धडक,चालकाचा जागेवरच मृत्यू
मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत बाईक चालकाने कचऱ्याच्या गाडीला धडक दिल्यामुळे बाईक चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पश्चिम परिसरात एस.व्ही रोडला आज सकाळी साडेसहा सातच्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेली बाईक कचऱ्याच्या गाडीला धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात बाईक चालवणारा 26 वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झालाय. घटनेची माहीती मिळताच गोरेगाव पोलिसांनी दखल घेत पुढील तपास तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा