देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. बिहार विधानसभेसाठी शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार, महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना टक्कर देण्याचा निर्धार


 

  1. आमचं सरकार असतं तर चीनी सैन्याला 15 मिनिटात बाहेर काढलं असतं; भारत-चीन सीमा वादावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल


 

  1. मराठा नेत्यांमधले मतभेद मिटवण्यासाठी नवी मुंबईत आज मेगा बैठकीचं आयोजन, संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या उपस्थितीत EWSच्या लाभावर खलबतं होणार


 

  1. मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक, डिस्टन्स आणि लर्निंगच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा संताप; सोलापूर विद्यापीठाच्या वेबसाईटमध्येसुद्धा बिघाड


 

  1. राज्यात कोरोनाची लाट ओसरतेय, गेल्या आठ दिवसांत रुग्णसंख्येत मोठी घट; गाफिल न राहण्याचं आरोग्य मंत्र्यांचं आवाहन


 

  1. बीडमध्ये 7.4 टक्के लोकांमध्ये कोरोना अँटिबॉडीज, तर जळगावात हे प्रमाण सर्वाधिक 25 टक्के; सिरो सर्व्हेचा अहवाल


 

  1. राज्यभरातील ग्रंथालय उघडण्याची सर्वस्तरातून मागणी, खासदार सुप्रिय सुळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा; सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष


 

  1. राज्यात कापूस नोंदणी प्रक्रिया सुरु; लांब धाग्याच्या कापसाला प्रती क्विंटल 5825 असा हमीभाव मिळणार


 

  1. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे; शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावे, शेतकरी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन


 

  1. मुंबई इंडियन्सचा विजयाचा चौकार, मुंबईकडून राजस्थानचा 57 धावांनी पराभव; पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी