Mandir Dome Roof Reason : आपण अनेक मंदिरांना किंवा मशिदींनी भेट देतो. त्यावेळी एक लक्षात येतं की धार्मिक स्थळांची छत नेहमी घुमटाच्या म्हणजे गोलाकार आकाराची असते. उत्तर भारत असो वा दक्षिण भारत, संस्कृती वेगवेगळ्या असल्या तरी मंदिरांच्या छताच्या बाबतीत मात्र सर्वत्र एकवाक्यता असल्यासारखं दिसतंय. मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर वरचा भाग हा पूर्णपणे गोलाकार असल्याचं दिसतंय. त्यामागे भारतातील वातावरणाचा संबंध असला तरी सोबत इतरही गोष्टींचा संदर्भ असल्याचं दिसतंय.अनेक लोक याचा संबंध धर्माशी जोडतात, जे एक प्रकारे योग्यच आहे. मात्र यामागे धर्म, विज्ञान आणि वास्तुशास्त्र अशी तीन कारणे आहेत.

मंदिरामध्ये सकारात्मक उर्जा

जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्याला एक प्रकारची मानसिक शांतता मिळते. मंदिरात कितीही घंटा वाजली किंवा कितीही आवाज आला तरी या गोंगाटातही एक प्रकारची शांतता असल्याचा भास निर्माण होतो. यामागे विज्ञान आहे. खरं तर, जेव्हा जेव्हा मंदिरात घंटा वाजवली जाते किंवा मंत्रोच्चार केला जातो तेव्हा घुमटाकार छतामुळे आवाज घुमता, मंदिराभोवती पसरतो. त्या आवाजामुळे एक प्रकारचे कंपन निर्माण होते. 

घुमटाकार छताचा वापर भक्तांना ध्यान आणि उपासनेत गुंतवून ठेवण्यासाठी तयार करण्यात आला होता. ही गोष्ट सकारात्मक ऊर्जेसाठी वापरली जाते. मंदिरात सकारात्मक ऊर्जा राहते. छतावरील घुमटाचा आकार त्यास सर्वत्र पसरविण्यास मदत करतो.

तापमानही संतुलित राहते

तुम्ही मंदिर किंवा मशिदीत गेल्यावर तेथील तापमान संतुलित असल्याचे जाणवते. बाहेरचे तापमान कितीही गरम किंवा थंड असले तरी मंदिराच्या आत गेल्यावर तापमान सामान्य होते. घुमटाकार छतामागेही एक शास्त्र आहे. वास्तविक, घुमटाकार छत मंदिराच्या आतील हवेचा प्रवाह नियंत्रित करते, त्यामुळे आतील तापमान संतुलित राहते. या कारणास्तव, मंदिर उन्हाळ्यात थंड राहते आणि जेव्हा बाहेर थंडी असते तेव्हा मंदिरातील तापमान सामान्य होते.

ही बातमी वाचा: