History Of World NGO Day : सरकारसोबतच समाजातील विविध घटकांसाठी काम करणारी संस्था म्हणजे एनजीओ किंवा नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. 27 फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक NGO दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यासाठी, साजरा करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की जगातील पहिली NGO कधी सुरू झाली गेली आणि त्यामागचा उद्देश काय होता? 


History Of World NGO Day :  एनजीओचा इतिहास काय?


जागतिक NGO दिन हा जगभरातील गैर-सरकारी संस्थांनी (NGO) केलेल्या योगदानाचा उत्सव साजरा करण्याचा एक प्रसंग आहे. एनजीओ शब्दाचा पहिला वापर 1945 मध्ये झाला होता. त्याच वर्षी सॅन फ्रान्सिस्को परिषद संपल्यानंतर चार महिन्यांनी 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र अधिकृतपणे सुरू करण्यात आले. यूएनने अधिकृतपणे काही विशेष एजन्सी (गैर-सरकारी संस्था) यांना त्याच वेळी आपल्या संमेलनांमध्ये निरीक्षक म्हणून समाविष्ट केले.


World NGO Day : जागतिक NGO दिन कधी साजरा केला जातो?


अधिकृतपणे जागतिक एनजीओ दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव 2010 मध्ये आला होता. त्यानंतर 2012 मध्ये त्याची घोषणा करण्यात आली होती. जागतिक NGO दिन पहिल्यांदा 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रे, युरोपियन युनियन आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी पाळला होता. फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने 27 फेब्रुवारी 2014 रोजी फिनलंडमधील हेलसिंकी येथे जागतिक NGO दिनाचा पहिला जागतिक उद्घाटन समारंभ आयोजित केला होता. सोप्या भाषेत सांगायचे तर, जागतिक आव्हाने सोडवण्यासाठी, मानवी हक्कांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी एनजीओ महत्त्वाची भूमिका बजावतात.


जागतिक एनजीओ दिनाचा इतिहास


फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने 27 फेब्रुवारी 2014 रोजी हेलसिंकी येथे जागतिक NGO दिनाचा पहिला जागतिक उद्घाटन समारंभ आयोजित केला होता. समाजात स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा करणे हा हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.


भारतात किती NGO सक्रिय आहेत?


इंडियन सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, देशात सध्या सुमारे 33 लाख एनजीओ आहेत. तथापि, धर्मादाय संस्था आणि प्रतिष्ठानांच्या यादीनुसार, एनजीओ विभागाच्या जागतिक संदर्भात भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे. इंटरनॅशनल ट्रेड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशननुसार, जगभरात 10 दशलक्ष एनजीओ आहेत. मात्र, यातील अनेक स्वयंसेवी संस्थाही निष्क्रिय आहेत.


ही बातमी वाचा: