Interesting Facts About Human Body : मानवी शरीराच्या काही अवयवांना स्पर्श केल्यास आपल्याला गुदगुल्या (Tickle) होतात आणि हसू आवरत नाही. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल की, इतरांनी आपल्याला स्पर्श केला तरच आपल्याला गुदगुल्या होतात. आपण आपल्याचं हाताने स्वतःला गुदगुल्या करु शकत नाही. यामागचं कारण तुम्हाला माहित आहेत का किंवा याचं कारण शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? नसेल तर येथे जाणून घ्या याचं कारण.


हसणे ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. शास्त्रज्ञांच्या मते, गुदगुल्या केल्यावर हसणे ही आपली प्रतिक्रिया स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेकदा लोकांना स्पर्श न करताही गुदगुल्या होतात. गुदगुल्या करण्याआधी त्या विचाराने घबराट निर्माण होऊन आपल्याला अस्वस्थ वाटते. या कारणामुळे अनेकांना हसू फुटते आणि असे लोक अनियंत्रित हसू लागतात.


काही लोकंना समजलं की, त्यांना कोणीतरी गुदगुल्या करणार आहे. तर, एखादा व्यक्ती तुम्हाला स्पर्श करण्याच्या भीतीमुळे तुम्ही हसू लागला. यामुळेच काही लोक गुदगुल्या न करताही खूप हसतात. गुदगुल्या करण्याची संपूर्ण प्रक्रिया एक प्रकारे आश्चर्यावर (Surprise) अवलंबून असते. जेव्हा कोणी आपल्याला अचानक गुदगुल्या करतो तेव्हा आपला मेंदू त्यासाठी तयार नसतो. त्यामुळे आपण हसतो.


याउलट जेव्हा आपण स्वत: आपल्याच हाताने स्वत:ला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला हे आधीच माहित असते, त्यामुळे आपल्याला गुदगुल्या होत नाहीत. संशोधनानुसार, जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो तेव्हा आपल्या मेंदूला हे कळते की हा आपला हात आहे आणि तो त्यासाठी मेंदू स्वतःला आधीच तयार करतो. म्हणूनच जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो तेव्हा आपल्याला गुदगुल्या होत नाही आपण हसत नाही.


युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील मेंदू शास्त्रज्ञाचा हवाला देत Howstuffworks.com साइटवर दिलेल्या माहितीनुसार, मेंदूचा सेरिबेलम भाग आपल्याला गुदगुल्या करण्यापासून रोखण्याचे काम करतो. सेरेबेलम हा मेंदूचा एक भाग आहे, जो शरीराच्या सर्व क्रियांचे निरीक्षण करतो. मेंदूचा हा भाग आपल्या शरीरातील सर्व प्रकारच्या संवेदनांमध्ये फरक करण्यास मदत करतो. म्हणूनच जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो तेव्हा आपण हसत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Frank Hoogerbeets : जे बोलला ते खरं ठरलं! भविष्यवाणी करणाऱ्या 'या' व्यक्तीची गोष्ट, भारताबद्दल म्हणाला...