Weird Beer : जगभरात मद्यप्रेमी आढळतात. त्यातच बिअरप्रेमींची संख्याही मोठी आहे. बिअर जगभरातील प्रसिद्ध अल्कोहोलिक ड्रिंकपैकी एक आहे. धान्यापासून बिअर तयार होते, हे तुम्ही ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्ही बिअर तयार करण्याच्या विचित्र पद्धतींबाबत सांगणार आहोत. हे ऐकून तुम्ही बिअर पिण्याआधी एकदा तरी विचार कराल हे नक्की.
बिअर तयार करण्याच्या विचित्र पद्धती
बिअर तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. बिअरची चव वाढवण्यासाठी जगभरात विविध प्रयोगही सुरु आहेत. काही बियरमध्ये अल्कोहोल जास्त असतं, तर काही टेस्टमध्ये बेस्ट असतात. पण जगात अशीही काही ठिकाणं आहे. जिथे मानवी मूत्र आणि हत्तीच्या शेणापासून बियर तयार करतात. या यादीमध्ये इतर काही विचित्र पदार्थांचाही समावेश आहे.
हत्तीच्या शेणापासून बनवलेली बिअर
जपानमध्ये हत्तीच्या शेणापासून बिअर बनवली जाते, ही बिअर अन-कोनो-कुरो (Un Kono Kuro) नावाने बनवली जाते. यासाठी कॉफीचाही वापर केला जातो. ही बिअर तयार करण्यासाठी आधी हत्तींना कॉफीची फळे खायला दिली जातात. हत्तीच्या पोटाच्या उष्णतेने या कॉफीच्या बिया भाजल्या जातात. त्यानंतर हत्तींच्या शेणातून बाहेर पडलेल्या कॉफीपासून बिअर तयार केली जाते. ही बिअर खूप महाग आहे.
स्पेस बिअर
सपोरो स्पेस बार्ली (Sapporo Space Barley) नावाची बिअर जरी जवापासून (Barley) तयार केली गेली जाते. पण याबाबत खास गोष्ट म्हणजे ही अंतराळात बनवण्यात आली आहे. ही बिअर ISS म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उगवलेल्या जवापासून सपोरो ब्रुअरीज लिमिटेडने तयार केली. त्याशिवाय अमेरिकेत सेलेस्ट-ज्वेल-अले नावाची बिअर देखील तयार केली गेली, जी चंद्राच्या उल्कापिंडांच्या धुळीपासून तयार करण्यात आली.
खारुताईची त्वचा
स्कॉटलंडची ब्रूडॉग कंपनी बिअर 'द एंड ऑफ हिस्ट्री' नावाने बिअर तयार करते. या बिअरमधील अल्कोहोलचे प्रमाण 55 टक्क्यांहून अधिक आहे. विशेष खार आणि शेकरू सारख्या प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या बाटल्यांमध्ये ही बिअर विकली जाते. या बिअरच्या फक्त 12 बाटल्या बनवण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
स्नेक वेनम बिअर
स्नेक वेनम बिअर नावाप्रमाणे सापाच्या विषापासून तयार केली जात नाही. ही जगातील सर्वात स्ट्राँग बिअर असल्याचा असा दावा केला जातो. या बिअरमध्ये 67.5 टक्के अल्कोहोल आहे. स्नेक वेनम बिअर स्कॉटलँडमध्ये तयार केली जाते. यामध्ये चेरी आणि ॲपलची चव असते.
चिली बिअर
घोस्ट फेस किल्लाह (Ghost face Killah) नावाची बिअर अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यात तयार केली जाते. ही अतिशल लाईट बिअर असून यामध्ये फक्त 5.2 टक्के अल्कोहोल आहे. मग याचं वैशिष्ट्य काय... तर ही मिरच्यापासून तयार केली जाते. यामध्ये सर्वाधिक तिखट मिर्चीचा वापर केला जातो.
गटारातील पाण्यापासून बिअर
अमेरिकेतील सॅन डिएगो येथील स्टोन ब्रुअरीने ही बिअर रिसायकल केलेल्या सांडपाण्याच्या पाण्याने तयार केली. ड्रेन वॉटर ऐकल्यावर तुम्हाला किळसही वाटेल.
लघवीपासून बनवलेली बिअर
मानवू मुत्रापासूनही बिअर तयार केली जाते. डेन्मार्कमधील रॉकस्लाइड म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान 2015 साली ही बिअर तयार करण्यात आली होती. कंपनीने सुमारे 50,000 गॅलन लघवी गोळा केली आणि त्यानंतर त्यापासून बिअर बनवण्यात आली. ही पिसनर बिअर या नावाने ओळखली जाते.