Winter Solstice 2022 Today: आज या वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र आहे. याला विंटर सोल्सटिस असंही म्हणतात. आज तुमचा दिवस 10 तास 41 मिनिटांचा आणि रात्र 13 तास 19 मिनिटांची असणार आहे. दरम्यान, तुम्ही कोणत्या देशात, किंवा शहरात आहात, यावरुनही दिवस आणि रात्र किती वेळ असणार हे ठरतं. 


22 डिसेंबर 2022 रोजी, पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना सूर्य मकर राशीच्या उष्ण कटिबंधावर असतो. यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. मध्य भारताबद्दल बोलायचं झालं तर तिथे सूर्योदय सकाळी 7.05 वाजता होईल. तर, सूर्यास्त संध्याकाळी 5.46 वाजता होईल. म्हणजे दिवसाची वेळ 10 तास 41 मिनिटं असणार आहे, तर रात्रीची वेळ 13 तास 19 मिनिटं असेल.


या दिवशी सूर्यप्रकाशाचा कोन 23 अंश 26 मिनिटं 17 सेकंद दक्षिणेकडे असेल. पुढील वर्षी 21 मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर असेल, त्यावेळी दिवस आणि रात्र समान वेळेची असेल. या इंग्रजीत Winter Solstice म्हणतात. Solstice हा लॅटिन शब्द आहे, जो Solstim वरून आला आहे. लॅटिन शब्द सोलचा अर्थ सूर्य असा होतो, तर सेस्टेअरचा अर्थ स्थिर राहणं. या दोन शब्दांना एकत्र करून सॉल्सटिस हा शब्द तयार झाला आहे, ज्याचा अर्थ सूर्याचं स्थिर राहणं असा होतो. या नैसर्गिक बदलांमुळे 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते.


इतर ग्रहांप्रमाणे, पृथ्वी देखील 23.5 अंशांवर झुकलेली आहे. झुकलेल्या अक्षावर पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याची किरणं एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडतात. त्यामुळेच, विंटर सॉल्सटिसच्या वेळी दक्षिण गोलार्धात (Hemisphere) विंटर सॉल्सटिस जास्त सूर्यप्रकाश असतो.


दरम्यान, उत्तर गोलार्धात कमी सूर्यप्रकाश असतो. या कारणास्तव, या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धात जास्त काळ राहतो. यामुळे येथे दिवस मोठा असतो. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये आजपासून उन्हाळा सुरू होणार आहे.


जगातील एका देशात सर्वात मोठा दिवस, तर दुसऱ्या देशात सर्वात छोटा दिवस 


विंटर सॉल्सटिस (Winter Solstice) असतं तेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याची किरणं सर्वात जास्त पडतात. तर, उत्तर गोलार्धात कमी पडतात. त्यामुळेच उत्तर गोलार्धात रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. तसेच, याऊलट दक्षिण गोलार्धात सूर्य सर्वाधिक वेळ असतो आणि त्याच परिसरात येणाऱ्या देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये आजपासून उन्हाळा सुरू होत आहे.