Urfi Javed Biography : प्लास्टिक, वायर अन् काचांपासून तयार केले ड्रेस परिधान करून चर्चेत आलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed). बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT) एन्ट्री झाल्यापासून उर्फी प्रचंड चर्चेत आली. बिग बॉस ओटीटीमधून उर्फी लवकर बाहेर पडली. पण त्यानंतर उर्फीने सोशल मीडियावर वेळोवेळी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. फुलं, कागद, ब्लेड तर कधी आणखी काही वापरून तयार केलेल ड्रेस परिधान करुन उर्फीने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे.


उर्फी जावेद लखनौची रहिवाशी (Uorfi Javed Biography)


अभिनेत्री उर्फी जावेद ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1997 रोजी लखनौमध्ये मुस्लिम कुटंबात झाला. उर्फीचं शालेय शिक्षण लखनौमध्येच झालं आहे. उर्फी सध्या 24 वर्षांची आहे. उर्फीने मास कम्यूनिकेशनचं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे.  तिला मीडियामध्ये यायचे होते. तिला अभिनयाची आवड होती.


उर्फी जावेदचा आतापर्यंतचा प्रवास (Urfi Javed Work)


उर्फी अगदी लहान वयात मुंबईत आली. छोट्या पडद्यावरील उर्फी जावेदने 2016 मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया' या मालिकेतून उर्फी जावेदने अभिनयाची सुरुवात केली. या मालिकेमध्ये तिने अवनी पंत नावाची भूमिका साकारली होती. यानंतर, 'चंद्र नंदिनी' या मालिकेमध्ये उर्फी राजकुमारी छाया या भूमिकेत झळकली. 'मेरी दुर्गा' या मालिकेमुळी उर्फी अधिक लोकप्रिय झाली. याशिवाय उर्फी 'बेपनाह', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की', 'ए मेरे हम सफर' या मालिकांमध्येही झळकली आहे. उर्फी 2020 मध्ये लोकप्रिय झाली.





त्यानंतर तिला 2021 मध्ये तिला बिग बॉस OTT मध्ये एन्ट्री मिळाली.


बिग बॉस ओटीटीमधून मिळाली खरी ओळख (Who is Urfi Javed?)


उर्फी जावेद मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये झळकली, पण तिला खरी ओळख बिग बॉस ओटीटीमुळे मिळाली. उर्फी बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये झळकल्यानंतर ती घराघरात पोहोचली. तरुणाईमध्ये तिची लोकप्रियता वाढली. उर्फी तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलची चर्चा होऊ लागली.


उर्फी तिच्या स्टाईलमुळेच विशेष चर्चेत आहे. उर्फी सध्या स्टाइलिंग डिवा बनली आहे. सोशल मीडियावर उर्फी अनेकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. उर्फी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर बनली आहे. 


उर्फीच्या कुटुंबात कोण-कोण आहे? (Urfi Javed Famiy)


उर्फीच्या आईचं नाव झाकिया सुल्ताना आहे. उर्फीला एक बहीण देखील आहे, तिचे नाव डॉली जावेद आहे. उर्फीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे.