Know Weight of Ashes of Dead Body : हिंदू धर्मामध्ये (Hindu Religion) एखाद्या व्यक्तीचा मृत्यू (Death) झाल्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. हिंदू धर्मामध्ये मृतदेहाला अग्नी दिला जातो. आता शवगृहांमध्ये यासाठी इलेक्ट्रीक मशीन असतात. मानवी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यावरही मानवी शरीर कधीही पूर्णपणे जळत नाही. 


शवगृहांमध्ये आता आधुनिक इलेक्ट्रिक मशीनद्वारे मृतदेहाला अग्नी दिला जातो, पण या मशीनमध्येही मानवी शरीर कधीही पूर्णपणे जळत नाही. मानवी शरीर जळाल्यानंतर त्याची राख उरते. उरलेल्या राखेचा अंश गंगेमध्ये प्रवाहित केला जातो. मानवी मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृत मानवी शरीराच्या राखेचं वजन किती असतं, हे तुम्हाला माहिती आहे का? हे जाणून घ्या.


शरीर पूर्णपणे राख झाले नाही


जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात, तेव्हा मानवी मृतदेह जाळला जातो. दरम्यान, शरीर कधीही पूर्णपणे जळत नाही. स्मशानभूमीत बसवलेल्या आधुनिक मशीनमध्येही शरीर पूर्णपणे जळत नाही. शरीराचे काही भाग जळतात आणि त्यांची राख होते, तर काही हाडं जळत नाही. उरलेली राख अस्थीच्या रूपात गंगेत विसर्जित केल्या जातात. पण, जर मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे शरीर पूर्णपणे जळाल्यानंतर, त्याच्या राखेचं वजनही त्याच्या शरीराच्या वजनाइतकं असतं का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पडला असेल, तर याचं उत्तर जाणून घ्या.


शरीराच्या राखेचे वजन


शास्त्रज्ञांच्या मते, मानवी मृतदेहाला जाळल्यानंतर जी राख उरते, ती शरीराच्या वजनाच्या 1 टक्के ते 3.5 टक्के असते. म्हणजे जर एखाद्या मृतदेहाचे वजन 80 किलो असेल, तर जळल्यानंतर जी राख राहील, ती सुमारे 2.8 किलो असेल. दरम्यान, जेव्हा माणूस जिवंत असतो, तेव्हा त्याच्या शरीरात भरपूर पाणी आणि विविध गोष्टी असतात. मृतदेह जळल्यानंतर, या सर्व गोष्टी नष्ट होतात आणि संपूर्ण शरीर राखेच्या सूक्ष्म कणांमध्ये बदलते. यामुळेच 80 किलो वजनाच्या मृतदेहाचे शेवटी 2.8 किलो राखेत रूपांतर होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kim Jong Un : किम जोंगला खूश करण्यासाठी शाळांमधून 25 कुमारी मुलींची निवड, उत्तर कोरियाचा हुकूमशाहाचा 'प्लेजर स्क्वॉड'