Dog Death: ब्रिटनमधून (Britain) एक हृदय पिळवटून टाकणारी प्राण्यांवरील क्रूरतेची (Animal Abuse) बातमी समोर आली आहे. डुडली पायने नावाच्या माणसाने फक्त स्वत:चा आनंद आणि मौजमजेसाठी एका अमेरिकन बुली जातीच्या (American Bully Breed) कुत्र्यावर प्रचंड अत्याचार केले. या माणसाने कुत्र्याच्या पिल्लाचा (Puppy) इतका छळ केला की शेवटी त्याचा दुर्दैवी अंत झाला.
हे कुत्र्याचं पिल्लू फक्त 11 आठवड्यांचं होतं. या व्यक्तीने त्याला मारुन टाकण्याच्या सहा दिवस आधीच त्याच्या बालपणीच्या मित्राकडून ते विकत घेतलं होतं. त्या पिल्लाचं नाव रॉको होतं. या व्यक्तीला कुत्र्याचा (Dog) छळ करण्यात इतका आनंद मिळायचा की त्याने एकदाही कुत्र्याला होणाऱ्या वेदनांबद्दल विचार केला नाही. त्याला नको नको ती वागणूक दिली आणि हे सगळं सहन होण्यापलीकडे गेल्यावर कुत्र्याचा मृत्यू झाला.
कुत्र्याला दिली अमानुष वागणूक
इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, डुडली पायने याने कुत्र्याचा अतिशय वाईट पद्धतीने छळ केला. त्याने कुत्र्याला एवढी मारहाण केली की त्याचं यकृत फाटलं. या व्यक्तीने कुत्र्याला नखांनी ओरखडलं. सिगारेटनं कुत्र्याच्या अंगावर चटके दिले. रॉकोच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या. रॉकोच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं पोस्टमॉर्टम तपासणीत स्पष्ट झालं. त्याचं यकृत फाटलं होतं. कंबर फ्रॅक्चर झाली होती. त्याच्या अंगावर अनेक जखमा होत्या.
फक्त मजेसाठी केला कुत्र्याचा छळ
रॉकोचा पोस्टमार्टम रिपोर्ट हा आतापर्यंतचा सर्वात हृदय पिळवटून टाकणारा रिपोर्ट होता, असं एका पशुवैद्यकाने पोलिसांना सांगितलं. फक्त मज्जा म्हणून या व्यक्तीने कुत्र्याला बेदम मारलं होतं आणि त्याच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयही चक्रावून गेलं. त्या माणसाच्या विरोधात निकाल देताना न्यायाधीशांनी सांगितलं की, आरोपीने केवळ स्वत:च्या आनंदासाठी कुत्र्याला मारलं आहे. त्याच्या कृत्याबद्दल त्याला कोणताही पश्चाताप नाही.
न्यायालयाने सुनावली शिक्षा
या क्रूरतेसाठी न्यायालयाने डुडली पायनेला 2 वर्षं 9 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे आणि त्याला 15 वर्षं प्राणी पाळण्यास बंदी घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राण्यांवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर प्राणीप्रेमी चांगलेत संतापतात आणि या नराधमांवर कारवाईची मागणी करतात.
हेही वाचा:
VIDEO: ढसाढसा पाजली सापाला दारू; मद्यपी टोळक्याचा पराक्रम, व्हिडीओ व्हायरल