Viral Video : जगात खवय्यांची (Food Lover) काही कमतरता नाही. असे लोक आहेत, जे खाण्यासाठी कुठेही आणि कधीही, काहीही करतील याचा काही नेम नाही. काही खायची इच्छा झाली तर मध्यरात्रीही गाडी घेऊन लोक बाहेर पडतात. जगात अशी काही ठिकाणे आहेत, जी फक्त खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळेच लोकही तिथे खाण्यासाठी जातात. अनेकदा लोक जेव्हा बाईक किंवा कारने लांबचा प्रवास करतात तेव्हा ते खाण्यापिण्यासाठी रस्त्यात एखाद्या हॉटेलमध्ये थांबतात, पण केवळ खायची इच्छा झाली म्हणून तुम्ही कधी रेल्वे चालकाला मध्येच रेल्वे थांबवताना पाहिले आहे का? होय, आजकाल असाच एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, जो खूपच मजेदार आहे.


 


 






रेल्वे चालक चक्क रस्त्याच्या मधोमध रेल्वे थांबवतो
या व्हिडीओमध्ये एक ट्रेन चालक रस्त्याच्या मधोमध रेल्वे थांबवतो आणि मासे खरेदी करण्यासाठी जातो. मग ते विकत घेतल्यानंतर तो धावत येतो आणि रेल्वेला धक्का देऊ लागतो. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वे फाटकाजवळ रेल्वे थांबवली आहे, जे बंद आहे. दोन्ही बाजूचे लोक वाट पाहत असतात की रेल्वे कधी पुढे जाते? आणि फाटक उघडते तेव्हा त्या रेल्वेमध्ये चालकच नसतो. कारण हा रेल्वेचालक चक्क ट्रेन थांबवून मासे खरेदी करण्यासाठी गेला होता. परत आल्यावर त्यांनी ट्रेनला हिरवी झेंडा दाखवला आणि ट्रेन पुढे निघाली. रेल्वेचा ड्रायव्हर काही खाद्यपदार्थ घेण्यासाठी ट्रेन थांबवणारे दृश्य तुम्ही याआधी कदाचितच पाहिले असेल.


रेल्वेचालकाचा मजेशीर व्हिडिओ


हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हे गृहस्थ त्यांची ट्रेन पार्क करून मासे खरेदी करण्यासाठी गेले होते. अवघ्या 44 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 27 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे.



नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने 'भूखा होगा बेचारा' असे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'शेवटी एक खवय्याच तो', तर एका यूजरने लिहिले आहे की, 'लोक उगाच यूपी बिहारचे नाव खराब करतात. या बाबतीत संपूर्ण भारताची एक सवय आहे.


इतर बातम्या


Viral Video: मुंबई पोलिसांसमोर तरुणानं गायलं केसरिया गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...