Viral Video: नशेत लोक अनेकदा असं काही करतात, ज्याचं त्यांना त्यावेळी भान नसतं, परंतु नंतर मात्र चांगलाच पश्चात्ताप होतो. नशेच्या धुंदीत माणसाचं डोकं नीट काम करत नाही. आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य? हेच लोकांना कळत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक मद्यधुंद व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ इतका भयानक आहे की तो पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल.


नेमकं घडलं काय?


केरळच्या तिरुअनंतपुरममधून एक धक्कादायक प्रकार समोर आला. दारुच्या नशेत एक व्यक्ती चक्क गळ्यात अजगर (Python) घेऊन फिरत होती. या व्यक्तीने इतकी दारू (Alcohol) प्यायली होती की, त्याला समजतच नव्हतं की तो स्वतःच्या गळ्यात मृत्यूचं जाळं घेऊन फिरत आहे.  


फिरता फिरता हा मद्यधुंद व्यक्ती गळ्यात अजगर गुंडाळलेल्या स्थितीत एका पेट्रोल पंपावर पोहोचतो. पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांना तो आपला फोटो काढण्याची विनंती करतो. या माणसाला कशाचीच जाणीव नव्हती. त्याने एवढी दारू प्यायली होती, की त्याला नीट चालताही येत नव्हतं.


जमिनीवर कोसळला मद्यधुंद व्यक्ती


या गळ्यात घेतलेल्या अजगराचं वजन इतकं जास्त होतं की, त्यामुळे तो व्यक्ती जमिनीवर पडला. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, तो व्यक्ती पडल्यानंतर उठलाही नाही आणि जमिनीलाच आपला पलंग समजू लागला आणि तिथेच झोपून राहिला. पेट्रोल पंपावर उपस्थित असलेले कर्मचारी हा सगळा प्रकार पाहत होते. तो माणूस अजगराला घेऊन जमिनीवर पडल्यावर कर्मचारी त्याच्याजवळ गेले आणि पोत्याच्या साहाय्याने त्याच्या गळ्यातील अजगर बाजूला काढला. अजगरानेही सहज त्या व्यक्तीची मान सोडली आणि तिथून पळ काढला.






पेट्रोलवरील कर्मचाऱ्याने वाचवला जीव


फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भात दिलेल्या वृत्तानुसार, दारुच्या नशेत गळ्यात अजगर घेऊन फिरत असलेल्या या महाभागाचं नाव चंद्रन आहे आणि तो केरळमधील कन्नूरचा रहिवासी आहे. हा व्यक्ती ज्या पेट्रोल पंपावर आला होता, तो वालापट्टनममध्ये आहे.


पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, त्याने याआधी कधीच साप पकडला नव्हता. मात्र चंद्रनला अजगराशी झुंजताना पाहून त्याने ताबडतोब पोतं घेतलं आणि त्या व्यक्तीच्या मदतीला धावून गेला. त्याने अजगराची शेपटी पकडून त्याला मागे ओढलं, त्यानंतर अजगराने त्या माणसाचा गळा सोडला आणि तिथून निघून गेला. सेल्स पर्सनने सांगितलं की सुरुवातीला तो घाबरला होता, परंतु जेव्हा त्याने पाहिलं की त्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे तेव्हा त्याने कोणताही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी गेला.


हेही वाचा:


VIDEO: ढसाढसा पाजली सापाला दारू; मद्यपी टोळक्याचा पराक्रम, व्हिडीओ व्हायरल