Israel Hamas War: इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) इस्रायलमध्ये दाखल झाले, असं रशियन वृत्तसंस्थेने म्हटलं होतं. मात्र हे वृत्त निराधार असल्याचं समोर आलं आहे. इस्रायलच्या समर्थनार्थ बायडन मैदानात उतरल्याचं बोललं गेलं. बायडन यांचा दौरा ऑक्टोबरमध्ये नियोजित आहे. बायडन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याशी चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे. हमास आणि इतर दहशतवादी संघटनांपासून देशाचं रक्षण करणं हा इस्रायलचाल अधिकारच नाही, तर कर्तव्य आहे, असं अमेरिकेने याआधी म्हटलं आहे.


गाझा पट्टीवरील हल्ले थांबणार?


इस्रायलच्या समर्थनार्थ जो बायडन दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन गाझा पट्टीवर इस्रायलकडून होत असणारे हल्ले थांबवण्यास देखील सांगू शकतात. हमास ही एक दहशतवादी संघटना असून गाझा पट्टीवर त्यांचं प्रभुत्व आहे. गेल्या आठवडाभरापासून गाझा पट्टीवर हजारो बॉम्ब हल्ले होत आहेत. हजारो नागरिकांचा यात मृत्यू होत आहे, 99 टक्के निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. जगभरात सध्या या गोष्टीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे बायडन नियोजित दौऱ्यानुसार इस्रायलला गेल्यास युद्धाचा मध्य मार्ग निघण्याची शक्यता आहे.


युद्धात मध्य मार्ग निघेल का?


इस्रायल हा मुस्लिम देशांनी वेढलेला देश आहे आणि आता मुस्लिम राष्ट्रांचा अमेरिकेवर दबाव वाढत आहे. पॅलेस्टाईनवर जर असे हल्ले सुरू राहिले तर आम्ही आमच्या नागरिकांना काय उत्तर द्यायचं? असा प्रश्न या राष्ट्रांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे या युद्धात मध्य मार्ग निघेल का? याचे प्रयत्न जो बायडन करू शकतात.


गाझा पट्टीवरील नागरिकांची स्थिती बिकट


इस्रायलने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात गाझा पट्टीचं मोठं नुकसान झालं आहे. अन्न, पाणी, इंधन, औषध, वीज सर्वच बाधित झालं आहे. गाझा पट्टीवर कसलीही मदत पोहोचू शकत नाहीय. हॉस्पिटलमधील जनरेटर देखील काही तासांत बंद पडतील, अशी स्थिती सध्या गाझा पट्टीवर आहे.


इस्रायल-हमास संघर्ष जुना


शेख हमाद यासीन यांनी 40 वर्षापूर्वी हमासची स्थापना केली. हमास हा उर्दू शब्द असून याचा अर्थ हरकतल मुकल्वामा अल इस्लामिया असा आहे. ब्रिटीशांनी 1948 साली पॅलेस्टाईन भागाची विभागणी करून इस्रायल या देशाची निर्मिती केली. हा अनेक देशांमध्ये पसरलेल्या 'मुस्लिम ब्रदरहूड' हमासचा एक भाग आहे. गाझा स्ट्रीप अशा 365 किलोमीटरच्या भागांमध्ये 2.2 कोटी पॅलेस्टिनी लोक राहतात.


हेही वाचा:


Israel-Palestine Conflict : इस्रायल-हमास संघर्ष 75 वर्ष जुना, युद्ध आताच का? पॅलेस्टाईनची भूमिका काय? A to Z प्रश्नांची उत्तरे