Indigo Viral Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होत असतो. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एअर होस्टेस (Air Hostess Viral Video) आणि एक प्रवासी वाद घालताना दिसत आहेत. एक मिनिटाचा हा व्हिडिओ (Viral Video) इस्तंबूलहून दिल्लीला (Delhi Viral Video)) येणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दोघांमध्ये जेवणावरून वाद झाल्याचं व्हिडीओत (Viral Video) त्यांच्या संभाषांवरून दिसत आहे. एअर होस्टेसने प्रवाशाला सांगितले की, तुम्ही बोट दाखवलं म्हणून माझी सहयोगी एअर होस्टेस रडत आहे. 


Fight Between Indigo Air Hostess Passenger Over Food Choices: प्रवासी आणि एअर होस्टेसमध्ये वाद


व्हिडीओमध्ये प्रवासी म्हणत आहे की, ही माझ्यावर का ओरडत आहे? यावर एअर होस्टेस म्हणाली की, तुम्ही आमच्यावर ओरडत आहेत. व्हिडीओमध्ये (Viral Video) एअर होस्टेस तिच्या सहकाऱ्याना शांत करताना दिसत आहे. एअर होस्टेसने (Air Hostess Viral Video) प्रवाशाला सांगितले, तुम्ही माझ्या क्रूशी असे बोलू शकत नाही. मी शांतपणे तुमचे ऐकत आहे. पण तुम्ही आमच्या क्रूचाही आदर केला पाहिजे.


प्रवाशाने एअर होस्टेसला विचारले की, तिने तिच्या क्रूचा अपमान कसा केला? यावर एअर होस्टेस म्हणाली की, तिच्या क्रूकला बोट दाखवत. हे ऐकून प्रवाशाने एअर होस्टेसला 'शट अप' म्हणाली. यानंतर एअर होस्टेसही प्रवाशाला 'यू शट अप' असे म्हणताना व्हिडीओत (Viral Video) दिसत आहे. हे संपूर्ण संभाषण इंग्लिश भाषेत होत होते. फ्लाइटमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) रेकॉर्ड केला आहे.






 


Fight Between Indigo Air Hostess Passenger Over Food Choices: इंडिगोने (IndiGo) दिली प्रतिक्रिया 


व्हिडीओमध्ये (Viral Video) एअर होस्टेस म्हणते की, मी येथे एक कर्मचारी आहे. मी तुझी नोकर नाही. एअर होस्टेसजवळ तिचा एक सपोर्टिंग क्रू देखील उपस्थित होता. तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. एवढे बोलून एअर होस्टेस मास्क घालून तिथून निघून जाते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगो एअरलाइननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंडिगोने सांगितले, प्रवाशाने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले. जेवणावरून वाद झाला. प्रवाशांच्या जेवणाबाबत तक्रार होती. प्रवाशांची सुविधा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे इंडिगोने म्हटले आहे.