Bihar Train Accident: कधी निष्काळजीपणामुळे, तर कधी व्हिडीओ बनवण्याच्या नादात लोक वेगात येणाऱ्या ट्रेनला (Train) धडकतात. अशा विविध घटना दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळतात. आता पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधून (Bihar) समोर आली आहे. बिहारमधील बगाहा रेल्वे स्थानकावरील एक व्यक्ती रेल्वे रुळावर पडली, यानंतर ट्रेन त्या माणसाच्या अंगावरून पूर्णपणे गेली. मात्र, सुदैवाने त्या व्यक्तीच्या शरीरावर एक ओरखडाही आला नाही.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळावर पडलेला 24 वर्षीय तरुण बेतियाच्या उत्तरवारी पोखरा भागातील रहिवासी आहे. तो कोल्ड्रिंक आणि बिस्किटं घेण्यासाठी ट्रेनमधून फलाटावर उतरला होता. जेव्हा तो बिस्किटं घेऊन ट्रेनकडे परतत होता, त्यावेळी त्याला ट्रेन स्टेशनवरुन सुटल्याचं दिसलं. सुरू झालेल्या ट्रेनने हळूहळू वेग पकडला.
आपली ट्रेन चुकणार असल्याचं समजताच त्या माणसाने लगेचच ट्रेनच्या दिशेने धाव घेतली. भरधाव वेगाने जाणारी ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करता करता त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे रुळावर पडला. ट्रेनचे पायदान आणि फलाटाच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून तो सरळ रुळावर पडला.
घटनेनंतर स्थानकावर एकच खळबळ
हा तरुण तोल जाऊन रुळावर पडला, त्याच वेळी ट्रेन पूर्णपणे त्याच्या अंगावरुन गेली. तरुणाला रेल्वे पटरीवर पडल्याचं पाहताच स्थानकावर एकच खळबळ उडाली. सर्वजण या तरुणाला पाहण्यासाठी जमले. स्थानकावरील पोलीस आणि प्रवासी तरुणाची मदत करायला धावून आले, पण तेही त्याला लगेच पटरीवरुन बाहेर काढू शकले नाही, कारण त्याच्या वरुन ट्रेन जात होती. त्यामुळे जमलेल्या सर्वांनी या तरुणाला शांतपणे पडून राहण्याचा सल्ला दिला.
तरुणाला किरकोळ दुखापत
ट्रेन पुढे गेल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने आणि काही प्रवाशांनी त्याला रुळावरून उचललं आणि प्लॅटफॉर्मवर घेतलं. प्रतीक कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्रथम त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं.
हेही वाचा:
Trending: BF च्या फोनमध्ये दिसलं असं काही; प्रेयसीला बसला धक्का, म्हणाली- 5 वर्षांचं नातं क्षणात....