Viral: जर तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख समजली तर? तुम्ही किती वर्षे जगाल? तुमचा मृत्यू कोणत्या दिवशी होणार? हे सर्व समजल्यानंतर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र एका व्यक्तीने एक असे अॅप तयार केले आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख समजू शकते. या व्यक्तीने दावा केला आहे की, हे अॅप तुम्हाला तुमच्या मृत्यूची खरी तारीख सांगेल. जाणून घ्या सत्य काय आहे?


मृत्यूच्या दिवसाचा अंदाज सांगणारे अॅप..!


ज्या व्यक्तीने हे अॅप बनवले आहे, त्याचे नाव ब्रेंट फ्रॅन्सन असून तो अमेरिकेचा रहिवासी आहे. 'डेथ क्लॉक' नावाचे हे अॅप आहे, ब्रेंटने दावा केला आहे की, ते यूजर्स त्यांच्या मृत्यूच्या दिवसाचा अंदाज सांगू शकतात. मात्र, लोक त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करून जास्त काळ जगू शकतात, असेही ते म्हणतात. डेलीमेलशी बोलताना, कॅलिफोर्नियाच्या या उद्योजकाने सांगितले की, त्याने त्याच्या मित्रांना ड्रग्जच्या व्यसनाशी झुंजताना पाहिले आहे. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यात मदत करायची होती. ब्रेंटचे म्हणणे आहे की त्याने हे ॲप तयार केले कारण तो आरोग्य सेवा आणि एकंदरीत परिस्थितीला कंटाळला होता.'






हे ॲप कसे कार्य करते?


डेथक्लॉक ॲप डाउनलोड केल्यानंतर, यूजर्सना त्यांचा आरोग्य डेटा आणि जीवनशैलीशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. उदाहरणार्थ, ते दररोज किती वेळ व्यायाम करतात? त्याला कोणत्याही प्रकारचा जुनाट आजार आहे का? डेथ क्लॉक नंतर तुमचा मृत्यू होण्याची शक्यता असलेल्या दिवस आणि वर्षाचा अंदाज लावते.


मृत्यू कधी ते कसा होईल? 25 प्रश्नांची उत्तरं मिळतील


ब्रेंट फ्रॅन्सन म्हणतात की, लोकांना 25 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तुम्ही तुमच्या सवयी बदलल्यास तुम्ही किती दिवस जगू शकाल याचाही अंदाज सांगितला जातो. तुमचा मृत्यू कधी होईल एवढेच नाही तर तुमचा मृत्यू कसा होईल हे देखील अॅप सांगू शकतो. लोकांना मदत करणे हा या ॲपचा उद्देश आहे. हे अॅप पूर्णपणे नकारात्मक होऊ इच्छित नाही. आम्ही लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या देखील सांगतो.


"घाबरवण्यासाठी हे ॲप नाही"


ब्रेंट म्हणाला- मला वाटते की आपण आपला जीव अजून थोडा वाचवू शकतो. तुम्ही दीर्घकाळ जगण्यास मदत करणारी जीवनशैली जगू शकता. त्यामुळे डेथ क्लॉक फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही. आम्ही तुम्हाला तुमच्या चांगल्या आरोग्याबद्दल जागरूक करू इच्छितो.


हेही वाचा>>>


Viral: हावरट 'दिदी'चा कारनामा! भावी नवऱ्याचे पॅकेज 30 लाखऐवजी 3 लाख समजल्यावर केला घोर अपमान, सोशल मीडीयावर व्हायरल


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )