Viral News :  आपला पाद विकून कोट्यवधींची कमाई करणाऱ्या तरुणीने आता अजब व्यवसाय सुरू केला आहे. युट्युबर स्टेफनी मॅटो हिने याआधी पाद विक्रीतून कमाई केली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर डॉक्टरांनी हा व्यवसाय सोडून देण्यास सांगितले होते. अजब मार्गाने कमाई करण्याची चटक लागलेल्या स्टेफनीने काहीसा विचित्र व्यवसाय सुरू केला आहे. 


LABbible या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, '90 डे फियान्से' या शोमध्ये दिसणारी स्टेफनी मॅटो सध्या आपल्या स्तनांना येणाऱ्या घामाची विक्री करत आहे. स्वत: ला 'Fartepreneur'सांगणाऱ्या 31 वर्षीय महिलेने पादची ऑनलाइन विक्री करून 1.4 कोटी रुपये कमावले होते. 


वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही तरुणी एका जारमध्ये आपला पाद भरून ठेवत होती. हा जार 74 हजार रुपये प्रति जार या किंमतीला विकत होती. या व्यवसायाला मागणी वाढल्याने तिने आपल्या आहारात बदल केला होता. अधिक पाद निर्माण करण्यासाठी स्टेफनी दररोज 3 प्रोटीन शेक, अंडे आणि ब्लॅक बीन सूप घेत होती. मात्र, तिला आहारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार तिने पाद विक्री करणे थांबवली. 


घामासाठी मेहनत


स्टेफनी मॅटोने स्तनाला येणारा घाम विकून दररोज चार लाख रुपये कमावत आहे. मॅटो हा तिला येणारा घाम एका बाटलीत भरून ठेवते आणि त्यांना प्रौढांसाठी असलेल्या संकेतस्थळावर विक्रीसाठी ठेवते. मागील विचित्र व्यवसायाच्या तुलनेत स्टेफनीला घाम काढण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. एका मुलाखतीत तिने सांगितले की, अधिक घाम येण्यासाठी ती खूप पाणी प्यावे लागते आणि उन्हात बसावे लागते. 


घामचा वास घेतात चाहते


स्टेफनीने सांगितले की, कडाक्याचे उन्ह असते तेव्हा त्यावेळी दिवसात 10 बाटल्या भरल्या जातात. या बाटल्या 38 हजार रुपये प्रति बॉटल इतक्या किंमतीला विक्री केली जाते. घामाचा वास घेऊन अथवा त्याचा आस्वाद घेऊन चाहते ती जवळ असल्याचे समजून घेतात. या नवीन व्यवसायातही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात असेही तिने म्हटले.


मागील चुकांपासून धडा 


मॅटो घाम काढण्यासाठी चार तास उन्हात बसते. ही बाब आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मागील व्यवसायात केलेल्या चुकांपासून शिकत मॅटोने घाई न करण्याचे ठरवले आहे. शरीराला कोणतेही नुकसान होऊ नये याची काळजी घेत असल्याचे मॅटोने म्हटले.