Video Viral : देशात सर्वाधिक सर्वसामान्य नागरिक हे रेल्वेने (Railway) प्रवास करतात, सध्या लग्नसराईचा हंगाम (Wedding Season) सुरू असून या काळात प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना वेटिंग तिकिटाच्या मदतीने प्रवास करावा लागतोय. प्रवास करताना ट्रेन आणि त्याच्या सीटशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्याला पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत, जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, तर तुम्हाला कन्फर्म सीटसाठी आधीच तिकीट बुक करावे लागेल, आणि जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर तुम्हाला बसण्यासाठी जागा मिळत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिलेला ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही, मग जे काही घडलं ते पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.


 


 




 


महिलेला ट्रेनमध्ये सीट मिळाली नाही, मग जे काही घडलं...


या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, एका महिलेला ट्रेनमध्ये सीट मिळाली नाही, यावेळी या महिलेने चक्क ट्रेनचा सेन्सर दरवाजा बंद होण्यापासून रोखला, ज्यानंतर रेल्वे प्लॅटफॉर्मवर चांगलाच गोंधळ उडाला. बराच वेळ गेला तरी ती महिला रेल्वेच्या दारातून उतरायला तयार नव्हती, मग काय, अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला ट्रेनच्या ड्रायव्हरजवळ बसवायला लावलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्लॅटफॉर्मवर एक ट्रेन उभी आहे आणि ट्रेनच्या दरवाजाजवळ बरेच लोक जमले आहेत. ज्यात काही पोलिस आणि रेल्वे कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात ते एका महिलेला ट्रेनमधून बाहेर येण्यास सांगत आहेत, पण ती खाली उतरायला तयार नाही. ती दारातच अडवून उभी राहते, यामुळे रेल्वेचा दरवाजा बंद होत नाही. अखेर रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी मिळून महिलेला रेल्वेतून बाहेर काढले आणि तिला घेऊन ड्रायव्हरच्या सीटजवळ बसवले. मग ट्रेन पुढे आपल्या मार्गाला लागली.


 


व्हिडीओ व्हायरल, महिलेने घातला गोंधळ 


सोशल मीडीयावर व्हायरल होत असलेला हा एक धक्कादायक व्हिडीओ आहे, जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे अवघ्या 34 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 15 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेक लोकांनी व्हिडिओला लाईक करत विविध कमेंट्सही केल्या आहेत.


 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका युजरने लिहिले आहे की, 'ही भारताची महिला शक्ती आहे', तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'एक महिला असण्याचे हे फायदे आहेत'. तर आणखी एका युजरने रागात लिहिलं आहे की, 'या महिलेच्या जागी एखादा पुरुष असता तर रेल्वे आणि पोलीस विभागाने त्या व्यक्तीवर अनेक खोटे गुन्हे दाखल केले असते. 


इतर महत्वाच्या बातम्या


Viral Video : आरपीएफ जवान बनले देवदूत, रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकलेल्या मुलीला दिले जीवनदान