Video Viral : सोशल मीडियावर (Social Media) आपण विविध प्रकारचे व्हिडीओ (Video Viral) पाहत असतो. जे व्हिडीओ नेटकऱ्यांना भावतात. ते काही क्षणातच व्हायरल होतात. असाच एक ह्रदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आई आपल्या मुलांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसत आहे. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जे पाहून युजर्सचे डोळे पाणावले आहेत.
आईने मुलाला वाचवले
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक आई आणि तिचे मूल एका घरासमोर रस्त्यावर चालताना दिसत आहे. आई आपल्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जाताना दिसत आहे. दरम्यान, आईला एक संशयास्पद आवाज ऐकू येतो. हे ऐकून, ती मागे वळून पाहते. धोक्याची जाणीव होताच आपल्या मुलांना त्याच्यापासून वाचवण्यासाठी ती आपल्या कवेत घेते.व्हायरल होत असलेली व्हिडीओ क्लिप दुख-दर्द पेनफुल नावाच्या इंस्टाग्राम पेजवर सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. मुलाला शाळेत आणत असताना महिलेच्या घराजवळ एक मोठे झाड उन्मळून पडल्याचे दिसून येते. त्या झाडाचा पडण्याचा आवाज ऐकून आई आपल्या मुलाला हातात धरून तशीच उभी राहते.
व्हिडीओला 8 मिलीयन व्ह्यूज
व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, झाड पडले, मात्र मुलाला कोणतीही दुखापत झाली नाही, धोक्याची चाहूल होताच आई तिची पाठ झाडाकडे वळवते आणि मुलाला आपल्या मिठीत घेते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला 8 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 4 लाख 76 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
इतर बातम्या
Video Viral : रेल्वे स्थानकानंतर आता ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये नमाज, प्रवाशांची अडवणूक, व्हिडीओ व्हायरल