Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल काही सांगता येत नाही. अनेक जणांना अशा व्हिडीओमुळे व्हायरल होऊन प्रसिद्धी मिळाली आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. ब्लड सँपल देताना एका पोलीस अधिकाऱ्याला पळता भुई थोडी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


इंजेक्शनची सुई बघून घाबरला पोलीस अधिकारी


तुम्ही आतापर्यंत एखाद्या लहान मुलाला इंजेक्शनच्या सुईपासून घाबरतात आणि सुईपासून दूर पळताना किंवा इंजेक्शन नको म्हणून दूर पळताना पाहिलं असेल. पण एखाद्या मोठ्या व्यक्तीला सुईपासून घाबरून ओक्साबोक्शी रडताना पाहिलं आहे का त्यातही चक्क एका पोलीस अधिकाऱ्याला? नसेल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रक्त तपासण्यासाठी रक्ताचा नमुना देताना एका पोलीस अधिकाऱ्याची पुरती तारांबळ उडाल्याचं दिसत आहे.


हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच






पोलीस अधिकाऱ्याला कोसळलं रडू


ब्लड सँपल देताना हा पोलीस अधिकारी इंजेक्शनच्या सुईला इतका घाबरला की अक्षरक्ष: हंबरडा फोडून जोरजोरात रडू लागला. हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे. उन्नाव येथील पोलिसांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये मेडिकल टेस्टसाठी ब्लड द्यायचं होतं. यावेळी आरोग्य अधिकारी एका पोलीस कर्मचाऱ्याचं सँपल घेण्यासाठी गेले तेव्हा इंजेक्शनची सुई पाहून या पोलीस अधिकाऱ्याला रडूच कोसळलं. इंजेक्शनला घाबरून पोलीस अधिकारी हात जोडून विनवणी करत रडू लागला.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेडिकल टेस्टसाठी पोलीस अधिकाऱ्याचं बल्ड सँपल घेताना इतरांना किती मेहनत घ्यावी लागली. हा मजेदार व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर भन्नाट कमेंट करत आहेत.