Trending viral video : स्ट्रीट फूड विक्रेते अनेकदा मोठ्या हॉटेल्सपेक्षा चांगले पदार्थ बनवताना दिसतात. अशावेळी त्यांची डिश लोकांमध्ये प्रसिद्ध असते. त्यांना एक वेगळी ओळख देते. अशातच, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते देखील नव्या नव्या कल्पनेमुळे असे विचित्र पदार्थ बनवताना दिसतात. हे पाहून खवय्यांचा राग अनावर होतो.


स्ट्रीट फूडचा प्रकार पाहून नेटकऱ्यांचा संताप


सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रसिद्ध पदार्थ एकत्र मिसळून त्याला नवा लूक देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या स्ट्रीट फूडचा प्रकार पाहून नेटकऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडीयावर अशा खाद्यपदार्थावर बरीच टीका होतानाही दिसत आहे. 


हृदयाच्या आकाराचे सँडविच


अलीकडेच गुजरातमधील एक स्ट्रीट फूड विक्रेता हृदयाच्या आकाराचे सँडविच बनवताना दिसला. ज्यावर यूझर्सच्या संतप्त प्रतिकिया पाहायला मिळत आहेत. गुजरातमधील भावनगर येथील हितेश सँडविच नावाच्या स्टॉलवर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. यामध्ये रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते प्रथम हृदयाच्या आकारात ब्रेड कापताना दिसत आहेत.


 






 


व्हिडीओला 6 लाख 51 हजारांहून अधिक व्ह्यूज


यानंतर, तो त्याच्या एका स्लाइसवर लोणी लावतो आणि दुसऱ्यावर जाम लावतो. नंतर एका प्लेटवर चॉकलेट किसून झाल्यावर ते ब्रेडवर टाकतो. तो दोन चॉकलेट आईस्क्रीम कापतो आणि ते ब्रेडमध्ये टाकून सर्व्ह करतो. असा विचित्र प्रकार पाहून नेटिझन्स चांगलेच भडकले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडीओला 6 लाख 51 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या