Watch Leopard Hunt Monkey : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. अनेक वेळा प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात. असे व्हिडीओ पाहून युजर्सचं मनोरंजन होतं. सध्या बिबट्याच्या शिकारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पातील बिबट्याच्या शिकारीचा व्हिडीओ चर्चेत आहे.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये (Panna Tiger Reserve) पर्यटकांना अद्भूत दृष्यं पाहायला मिळालं. एक बिबट्या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारून शिकार करताना दिसला. हा बिबट्याने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारून माकडाच्या पिल्लाची शिकार करताना दिसत आहे. याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बिबट्या झाडावर चढतो आणि माकडाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी दुसऱ्या झाडावर वेगानं उडी मारतो. माकडाच्या पिल्लाला तोंडात पकडून हा बिबट्या झाडावरून थेट खाली जमिनीवर येतो. शिकारीचा हा व्हिडीओ पन्ना व्याघ्र प्रकल्पाने ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये शिकार केल्यानंतर बिबट्याला झाडावरून खाली येताना पाहून या बिबट्यावर गुरुत्वाकर्षण शक्ती अजिबात काम करत नसल्याचे दिसते.
पन्ना व्याघ्र प्रकल्पाने व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत म्हटलं आहे की, 'एक दुर्मिळ दृश्य @pannatigerreserve. एक बिबट्या झाडावर उडी मारताना आणि माकडाच्या पिल्लाची शिकार करताना दिसत आहे.' 28 जून रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि व्हिडीओला 271 लाईक्सही मिळाले आहेत.
संबंधित इतर बातम्या