Chennai Officers Training Academy : आपली आई, निवृत्त मेजर स्मिता चतुर्वेदी  (Major Smita Chaturvedi)  यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या एका मुलाची गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. स्मिता चतुर्वेदी यांच्या मुलाला शनिवारी चेन्नईतील त्याच अकादमीतून भारतीय सैन्यात सामील करण्यात आले, जिथून त्या 27 वर्षांपूर्वी उत्तीर्ण झाल्या होत्या.


देशसेवेत रूजू आई-मुलाची गोष्ट व्हायरल


चेन्नई येथे नुकतेच भारतीय सैन्यात कॅडेट्सचे कमिशनिंग करण्यात आले आहे. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये हे कमिशनिंग (Indian Army Commissioning) झाले आणि यावेळी मालदीवचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मेजर जनरल अब्दुल्ला शामल हेही उपस्थित होते.


आई आणि मुलगा एकाच अकादमीमधून कमीशन


भारतीय सैन्यात भरती झालेल्या सैनिकांमध्ये एक मुलगा असा होता, जो 27 वर्षांपूर्वी त्याच्या आईप्रमाणेच त्याच चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून कमीशन झाला होता. चेन्नईच्या संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने या खास दिवशी मेजर (सेवानिवृत्त) स्मिता आणि त्यांच्या मुलाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबतच मंत्रालयाने लिहिले की, '27 वर्षांपूर्वी 1995 मध्ये चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधून कमिशन मिळालेल्या मेजर स्मिता चतुर्वेदी (सेवानिवृत्त) यांनी आपल्या मुलाला त्याच अकादमीमध्ये कमिशन घेताना पाहिले.


 


 






जुने दिवस आठवले.


' मेजर स्मिता चतुर्वेदी (निवृत्त) यांनाही अकादमीतील त्यांचे जुने दिवस आठवले. एका व्हिडिओ संदेशात त्यांनी सांगितले की, ही पिढी आपल्या पुढे आहे आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे.