Auto Viral Video : एका रिक्षामध्ये केवळ तीन लोक बसू शकता किंबहूना रिक्षाची क्षमताच तेवढी असते. पण शेअरिंग  रिक्षा या प्रकारात मागे चार पुढे तीन म्हणजे सात माणसं बसवली जातात. पण उत्तर प्रदेशातील एक असे उदाहरण समोर आले आहे जे फक्त भारतातच पाहायला मिळेल. या व्हिडीओमध्ये एका  रिक्षातून तब्बल  27 प्रवाशांनी प्रवास केला आहे. हे पाहून पोलीस देखील चक्रावून गेले. सोशल मीडियावर हा प्रचंड व्हायरल होत आहे.


सोशल मीडियावर उत्तरप्रदेशमधील फतेहपूरचा एक व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिक्षावाल्याने एका रिक्षात 27 प्रवासी बसवण्याचा असा अजब प्रताप याने करून दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाला थांबवले. पोलिसांनी रिक्षाला थांबवले त्यावेळी घडलेला प्रकार पाहून सर्व हैराण झाले. या रिक्षात चालकासह 27 प्रवासी होते. ही संपूर्ण घटना  बिंदकी कोतवाली येथील  ललौली चौकात घडली होती. पोलिसांनी  तपासणी केली असता लहान मुलासह 27 जण बाहेर आले.


 






 


सोशल मीडियावर जेव्हा व्हिडीओ समोर आला तेव्हा आश्चर्यचकित झाले. या रिक्षामध्ये 27 जण कसे बसले? हा प्रश्न पडला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी रिक्षावाल्याला समज दिली आणि रिक्षा जप्त केली आहे,


हा व्हिडीओ सोशल मीडियावर एएनआयने पोस्ट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेकांनी शेअर केला आहे. एक यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, CNG महाग काय झाला, तर चार रिक्षामध्ये बसणारे प्रवासी एका रिक्षात बसवले आहे.