Thar Jeep Stunt Video : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. कधी प्राण्यांचे तर कधी भन्नाट स्टंटचे व्हिडीओही पाहायला मिळतात. मात्र कधी - कधी हे स्टंट करणं चांगलंच महागात पडतानाही पाहायला मिळतं असे व्हिडीओही प्रचंड चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, जीपसोबत स्टंट करणं काहा जणांना किती महागात पडलं आहे ते. काही तरुण जीपमध्ये बसून स्टंट करण्याच्या प्रयत्नात होते, पण यावेळी जीपवरील नियंत्रण सुटून जीप पलटली आणि सहा जण जखमी झाले. हा स्टंटचा प्रयत्न कसा फसला आहे, ते व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल.


जीपसोबत स्टंट करणं पडलं महागात


सोशल मीडियावर तरुणांच्या जीप स्टंटचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण महिंद्रा थार जीपमध्ये (Mahindra Thar Jeep) बसून स्टंट करताना दिसत आहेत. मात्रा हा स्टंट करताना अचानक एक दुर्घटना घडली. हा व्हायरल व्हिडीओ बिहारमधील समस्तीपूरच्या गद्दोपूर पेठियास येथील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, काही तरुण काळ्या रंगाच्या महिंद्रा थार जीपमध्ये बसताना दिसत आहेत. हे तरुण जीपमधून मैदानात वेगाने गोल-गोल चक्कर मारताना दिसत आहेत. यावेळी अचानक जीपवरच नियंत्रण सुटल्याने जीप पलटी होते आणि जीपमधील तरुण जमिनीवर कोसळतात. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे.


पाहा व्हिडीओ : पाहता-पाहता जमिनीवर आपटले तरुण






दुर्घटनेत सहा तरुण जखमी


तरुण जीप भरधाव वेगाने चालवत मैदानात गोल-गोल चक्कर मारत स्टंट करत होते. यावेळी चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटतं आणि जीप पलटले. या दुर्घटनेमध्ये सहा तरुण जखमी झाले आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, हे तरुण दारु पिऊन हुल्लडबाजी करत होते. या तरुणांनी मैदानातच दारु पिऊन पार्टी केली. त्यानंतर हे तरुण जीपवरून स्टंट करत होते. दारु प्यायल्याने ही दुर्घटना घडल्याचं काही मीडिया रिपोर्टचं म्हणणं आहे.


घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत


या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ Prakash Kumar नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि शेअरही केला आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.